scorecardresearch

Premium

अर्जित सिंगचे ‘हे’ गाणे ऐकताच कुत्र्यानेदेखील लावला सूर; सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मजेशीर व्हिडीओ पाहा…

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये, चक्क एका कुत्र्याने आवडत्या गाण्यासोबत सूर लावलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. या अतिशय गोड व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया अगदी पाहण्यासारख्या आहेत.

dog singing arjit sings song viral video
पाळीव कुत्र्याने त्याच्या आवडीचे गाणे ऐकताच, त्यासोबत गाणे गायल्याचा व्हायरल व्हिडिओ पाहा. [photo credit – Freepik]

सोशल मीडियावर, एखाद्या गाण्यावर प्राणी प्रतिक्रिया देत असतानाचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये एखादा कुत्रा कधी गाण्यावर नाचताना दिसतो, तर कधी एखादे मांजर अगदी मन लावून तिचे आवडते गाणे ऐकत असल्याचे आपण पाहिले आहे. अशातच सध्या एका मजेशीर व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. कारण – या व्हिडीओमधील कुत्रा चक्क अर्जित सिंगचे, ‘तुझे कितना चाहने लगे हम’ गाणे लागताच त्या गाण्यासोबत गाताना दिसतो आहे.

“पाळीव कुत्र्याच्या कानावर जेव्हा त्याचे आवडते गाणे ‘दिल का दारिया’ हे पडते, तेव्हा त्याची अशी प्रतिक्रिया असते”, असे कॅप्शन लिहित @sachkadwahai या अकाउंटने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला, कुत्रा एका सोफ्यावर आराम करताना दिसत आहे. एक दोन गाण्यांनंतर, जसे त्याचे आवडते गाणे टीव्हीवर लागते, तसा तो ताडकन गाणे गाण्यास सुरुवात करतो, असे पाहायला मिळते.

video of family eating 3 course meal on train went viral
Viral video : पुलाव, पराठा, अन् लोणचं; रेल्वेमधील जेवणाचा राजेशाही थाट पाहून नेटकरी झाले थक्क! व्हिडिओ पाहून म्हणाले…
four couple yoga pose to stay fit together
Couple yoga poses : नाते आणि आरोग्य दोन्ही राहील उत्तम! तंदुरुस्त रहाण्यासाठी हे ४ प्रकार पाहा
marathon, medical tests, running, precautions, Health, marathi news,
Health Special: मॅरेथॉन धावताय? तर या टेस्ट केल्या आहेत का? (भाग १)
tree-cutting_8b16ee
धक्कादायक! पुण्यात होणार २२ हजार झाडांची कत्तल?

हेही वाचा : अरे देवा! विचित्र पदार्थांमध्ये अजून एकाची भर… सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या सफरचंद इडलीचा व्हिडीओ पाहिलात का?

या व्हिडीओला आजवर तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून नेटकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात कमेंट्सदेखील केलेल्या आहेत. यामधील काही प्रतिक्रिया पाहा.

एकाने, “कदाचित त्याचा नुकताच ब्रेकअप झाला असेल” अशी मिश्कील कमेंट केली.
दुसऱ्याने, “मी सुद्धा अगदी असाच गातो, हा हा हा” असे आपल्या गाण्याबद्दल सांगितले. तिसऱ्याने, “आई गं… किती गोड गातोय तो कुत्रा… फारच छान”, असे लिहिले आहे.
चौथ्याने, “त्याला कुणाची तरी आठवण येत आहे, म्हणून तो हे गाणे बदलायला सांगतोय…” अशी प्रतिक्रिया दिली.


तर शेवटी पाचव्याने, “हे कमेंट सेक्शन फारच मजेशीर आहे”, असे सर्व नेटकऱ्यांचे कौतुक करणारी कमेंट केलेली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video went viral on social media after dog singing arijit singh song watch how netizens reacted dha

First published on: 06-12-2023 at 16:04 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×