सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरु आहे. याच लग्नसराईदरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातील काही व्हिडिओ आपल्याला पोट धरुन हसायला लावतात. या व्हिडीओमध्ये कधी मुलांनी लग्न लावणाऱ्या गुरुजींची केलेली मस्करी असते, तर कधी वरमाला घालताना वधू-वराच्या गमतीदार भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.

हेही पाहा- आजोबांनी विचारलेल्या विचित्र प्रश्नापुढे झाली गुगलची बोलती बंद; Video पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. शिवाय या व्हिडीओमधील एका मुलावर ओढावलेला प्रसंग पाहून तुम्हालाही वाईट वाटेल. हो कारण लग्न समारंभातील एका विधीदरम्यान घरातील काही मुलांनी नवरीला वर उचलून घेतलं असता वधूने जे काही केले ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

हेही वाचा- विद्यार्थिनीने शिक्षकासोबत पळून जाऊन केलं लग्न; घरच्यांना दिली सुप्रिम कोर्टाची धमकी

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, एका लग्न समारंभासाठी खूप गर्दी जमली असून या लग्नसोहळ्यातील काही विधी सुरू असल्याचं दिसतं आहे. याचवेळी लग्न समारंभाच्या मध्यभागी असलेली नवरी मुलीची भावंडे तिला आपल्या खांद्यावर उचलून घेतात. मात्र, नवरीला अचानक उचलल्यामुळे तिचा तोल गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे. शिवाय तोल जावून आपण पडू नये म्हणून नवरी काहीतरी आधार शोधण्याचा प्रयत्न करत असताना ती एका मुलाच्या डोक्यावरील केस धरते. ती या मुलाचे केस इतके घट्ट पकडताना व्हिडीओमध्ये दिसतं आहे की, त्या मुलाचे काही केस तुटून त्या नवरीच्या हातामध्ये आले असतील याच शंका नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो इंस्टाग्रामवर sakhtlogg नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिलं आहे. तर अनेकांनी लाईकही केलं आहे. शिवाय ‘थोडं दु:ख झालं पण तेवढं चालतं’ असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.