सतत चिंताग्रस्त राहणे ही सध्याच्या तरुण पिढीसमोरील सर्वात मोठी समस्या आहे. रोजच्या कामाचा ताण, डेडलाईन्स, वैयक्तिक आयुष्यातील समस्या यांमुळे तरुण पिढी सतत तणावग्रस्त असते. यामुळेच ‘अँगझायटी’ हा आजार होतो. मग यावर उपचार मिळवण्यासाठी थेरपीचा आसरा घ्यावा लागतो. अँगझायटीवरील थेरपीबद्दल तुम्ही अनेकजणांकडुन ऐकले असेल, पण सध्या चर्चेत असणारी अँगझायटी थेरपी पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

प्रीकाटेड अकॅडमी या रशियन कंपनीने अँगझायटीवर एक अनोखी थेरपी सुरू केली आहे. या थेरपीमध्ये रुग्णाला एका तासासाठी जमिनीत पुरले जाते, हे ऐकून कोणालाही भीती वाटेल. पण कंपनीचा असा दावा आहे की यामुळे लोकांच्या मनातील भीती आणि चिंतेपासून सुटका मिळवण्यासाठी मदत होते. ही हॉरर वाटणारी थेरपी मोफत नसून यासाठी तब्बल ४२ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

आणखी वाचा : हत्तीबरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही अन्…; Viral Video वर नेटकऱ्यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या थेरपीचे ऑनलाईन वर्जन देखील उपलब्ध आहे. ज्याची किंमत १२ लाख रुपये आहे. या ऑनलाईन थेरपीमध्ये त्या व्यक्तीला त्याची अंत्ययात्रा आणि अंत्यविधी ऑनलाईन दाखवले जातील. यामध्ये अंत्यविधीदरम्यान वाजवले जाणारे संगीत, मेणबत्त्या अशी वातावरणनिर्मिती केली जाते. त्या व्यक्तीचे मृत्यूपत्र देखील बनवले जाते. या प्रक्रियेपेक्षा पुरले जाण्याची थेरपी जास्त परिणामकारक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या भीतीदायक थेरपीच्या प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.