समाजात दोन प्रकारची माणसं असतात, एक जे प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारी तर दुसरी प्राण्यांना विनाकारण त्रास देणारी. यातील प्राणीप्रेमी लोक अनेक मुक्या प्राण्यांना घरी पाळतात, त्यांची काळजी घेतात, तर काही लोक या मुक्या प्राण्यांना त्रास देतात, कधी त्यांना दगड मारतात तर कधी प्राण्यांना गाड्यांना बांधून फरफटत नेतात. विनाकारण प्राण्यांना अमानुष वागणूक देतात. सध्या अशाच एका व्यक्तीने कुत्र्यावर विनाकारण चार गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

हेही पाहा- Video: ..म्हणून मी कुत्रा झालो; १२ लाख खर्च केला, ‘या’ पठ्ठ्याचं कारण ऐकून डोकंच धराल

आश्चर्याची बाब म्हणजे चार गोळ्या लागूनही मिली नावाची कुत्रीचा सुदैवाने जीव वाचला आहे. कदाचित हे वाचून तुम्हाला धक्का बसेल. मात्र, ही सत्य घटना आहे. मिलीसोबत घडलेला किस्सा ऐकून तुम्ही थक्क व्हाल. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रशियामधील आहे. तेथील भटक्या कुत्रीच्या डोक्यात एका माथेफिरुने चार गोळ्या घातल्या. मात्र, या कुत्रीला एका प्राणी प्रेमीने जीवदान दिलं आहे.

हेही पाहा- चहा करण्यासाठी गॅस सुरु केला अन् क्षणात झालं होत्याचं नव्हतं; भीषण स्फोटाचा Video होतोय व्हायरल

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनमधील ब्राइटन येथे राहणाऱ्या २८ वर्षीय केसी कार्लिनने कुत्र्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्याचा ध्यास घेतला आहे. कार्लिनने अशा ४ कुत्र्यांना दत्तक घेतले आहे ज्यांना काही लोकांनी विनाकारण त्रास देत जखमी केलं होतं. मिली ही त्या ४ पैकीच एक आहे. या कुत्रीला एका माथफिरुने तब्बल चार गोळ्या घातल्या होत्या.

हेही पाहा- भररस्त्यात उडत आला भलामोठा दगड आणि बाइकस्वाराला उडवून नेलं; Video शिवाय विश्वासच बसला नसता

केसीने डेली स्टारला सांगितले की, ‘मिली ३ महिन्यांची असताना कोणीतरी तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मिली ही रस्त्यावरुन फिरत असताना काही लोकांनी तिला मारण्याचा प्रयत्न केला. माथेफिरुंनी तिच्या डोक्यात ४ गोळ्या झाडल्या. त्या गोळ्या मिलीच्या डोक्याला आणि डोळ्यात लागल्या होत्या. जेव्हा केसीने मिलीला जखमी अवस्थेत पाहिले तेव्हा तिला श्वासही घेता येत नव्हता. तिचे नाक तुटले होते आणि ती वेदनेने तफडत होती आणि आपली शेपटी हलवत लोकांना मदतीसाठी बोलावत होती’ असं केसीने सांगितलं.

शस्त्रक्रियेतून जीव वाचला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, केसीने मिलीच्या उपचारासाठी निधी गोळा केला आणि ब्रिटनमधील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार केले. ही शस्त्रक्रियादेखील अवघड होती. शस्त्रक्रियेदरम्यान, मिलीच्या डोळ्यांमध्ये एक मेटल ट्यूब घालण्यात आली होती, ज्याद्वारे ती श्वास घेऊ शकत होती. परंतु एकदा मिली जोरात शिंकली असता ती ट्यूब बाहेर आली. यानंतर मिलीची शस्त्रक्रिया बराच काळ चालली, शिवाय तिच्यासाठी नवीन नाक बनवण्यात आलं असून चेहऱ्यावर केलेल्या सर्जरीमुळे आता मिलीचा चेहरा पुर्णपणे बदलला आहे.