यूपीआयद्वारे पेमेंट करताना आपल्याला कोणत्याही नंबरवर पैसे ट्रान्स्फर करायचे असतील, तर आपण खूप काळजीपूर्वक नंबर टाकतो. पण, काही वेळा चुकून एखादा अंक चुकीचा टाकला जातो; ज्यामुळे पैसे चुकीच्या नंबरवर ट्रान्स्फर होतात. अशा परिस्थितीत हे पैसे पुन्हा मिळवायचे कसे, असा प्रश्न पडतो. असेच काहीसे एका महिलेसोबत घडले आणि तिने हे सोशल मीडियावर शेअरही केले. महिलेने चुकून कोणत्या तरी नंबरवर पैसे ट्रान्स्फर केले आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीकडून पुन्हा पैसे परत मागितले. मग त्यानंतर असे काही घडले; ज्याबाबत तिने सोशल मीडियावर शेअर केले. या महिलेने व्हॉट्सअप चॅटचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो आता चर्चेचा विषय बनला आहे.

आपण पैशांच्या व्यवहारासंबंधीचे हे चॅट वाचू शकतो. एक व्यक्ती म्हणते की, मला पैसे मिळालेत. हे कोणी पाठवले आहे? तेव्हा ती महिला सांगते की, माझ्याकडून चुकून तुम्हाला पैसे पाठवले गेले. कृपया मला ते पैसे परत करा. त्यावर समोरून उत्तर आले की, मी असे करणार नाही. त्यानंतर ती महिला त्याला विनंती करते; ज्यावर ती व्यक्ती म्हणतो की, मी पाठवत आहे… मी फक्त विनोद करीत होतो. काही वेळ चॅट केल्यानंतर ती व्यक्ती पैसे परत करते. त्यानंतर दोघे एकमेकांना धन्यवाद आणि सॉरी म्हणू लागतात.

गृहपाठ न करण्यासाठी वापरलेल्या युक्तीमुळे पोलिस थेट पोहोचले घरी; पालकांना बसला धक्का!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोघांमधील व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट @medusaflower नावाच्या ट्विटर युजरने शेअर केले आहेत. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, मी एका चुकीच्या नंबरवर पैसे पाठवले होते. यावेळी मला अशी एक व्यक्ती भेटली; जी केवळ खूप छानच नाही तर वेडीही होती. क्षणभर मला खूप घाम फुटला. या पोस्टला आतापर्यंत ६८ हजारांहून अधिक व्ह्युज आणि ५००;हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी यावर कमेंटही केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलेय की, UPI वर चॅट ऑप्शन कधीच पाहिले नाही. तर दुसरा म्हणाला की, जगात काही चांगले लोक आहेत. पण, काहींनी ही गोष्ट खरी आहे की खोटी, अशी शंका उपस्थित केली; तर बहुतेकांनी अशा लोकांमुळेच चांगुलपणा जिवंत असल्याचे मत व्यक्त केले आहे.