मराठी चित्रपट सृष्टीची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने हिंदी चित्रपट सृष्टीमध्येही आपला डंका वाजवला. मिमी चित्रपटातील तिच्या कामाचे विशेष कौतुक झाले. सध्या ती तिच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. असे असतानाही ती तिच्या चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी सई तिच्या पोस्टमुळे सतत चर्चेत असते. नुकताच तिने एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून यामुळे सध्या ती टीकेची धनी ठरतेय.

मधुर भांडारकर यांच्या आगामी ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटामध्ये सई प्रतीक बब्बरच्या पत्नीच्या रूपात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे नाव आणि ट्रेलर या दोन गोष्टींवरुन या चित्रपटाची पार्श्वभूमी करोना काळातली आहे हे लगेच लक्षात येते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो सईने सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन दिले, “द स्ट्रगल इज रिअल” यावरून नेटकऱ्यांनी तिच्यावर चांगलीच टीका केली आहे.

फोटोमध्ये दिसणाऱ्या हातगाडीवर ती झोपली आहे. एका हाताने तिने काळ्या रंगाची भली मोठी छत्री पकडली आहे. त्यांच्या टीममधला एक माणूस ती छत्री पकडून उभा आहे. यानंतर नेटकऱ्यांनी सईला चांगलंच सुनावलं आहे. सई स्वतः विश्रांती घेत आहे आणि एक दुसरी व्यक्ती तिच्यासाठी छत्री घेऊन उन्हात उभा आहे. असे असतानाही ती संघर्षाबद्दल बोलत आहे, अशी चपराक त्यांनी लगावली.

बिर्याणीवरून ग्राहकांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्याला केली मारहाण; CCTV Viral झाला आणि…; पाहा नेमकं काय घडलं

दोन दिवसांपूर्वीच पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोवरून नेटकऱ्यांनी सईला खडे बोल सुनावले आहेत. एका युजरने म्हटलंय, “हातगाडीवर शांत झोपणे हाच संघर्ष आहे का? तुटपुंज्या मोबदल्यासाठी छत्री घेऊन उभं राहायला भाग पाडलेल्या व्यक्तीचा ‘संघर्ष खरा’ आहे.” तर दुसऱ्या युजरने म्हटलंय, “तू छत्रीवाल्याबद्दल बोलत आहेस ना?” आणखी एका युजरने म्हटलंय, “दूसरा माणूस तुझी छत्री पकडून थांबलाय आणि कसला स्ट्रगल?”

आठ वर्षांपासून खात होती स्वतःचेच केस; पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सई, प्रतीक यांच्यासह या चित्रपटामध्ये श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडी हे कलाकारही दिसणार आहेत. झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.