Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर, तर कधी थरारक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. हे व्हिडीओ क्षणात लाखो व्ह्युज मिळवतात. पण, या हिंस्र प्राण्यांचे व्हिडीओ जंगलातील असतात, ज्यात ते इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; पण त्यात एका बिबट्याने मानवी वस्तीत शिरकाव केल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
घरातील कुत्रा, मांजर, म्हैस, बैल हे पाळीव प्राणी आपण जेवढा जीव लावू, त्याहून अधिक माया ते आपल्यावर करतात. आपल्यापेक्षा त्या प्राण्यांचा आपल्यावर जास्त विश्वास असतो. हे प्राणी अनेकदा आपल्या मालकाला त्याच्या संकटात मदत करतात. या लाडक्या प्राण्यांना घरातील सदस्यांप्रमाणेच प्रेम, माया दिली जाते. अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ आजपर्यंत आपण पाहिले आहेत. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही मांजरीच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करावेसे वाटेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घरासमोरच्या परिसरात एक लहान चिमुकला चेंडूबरोबर खेळ आहे आणि त्याच वेळी एक बिबट्या कुंपणाबाहेरून उडी मारून सरळ आत येतो आणि चिमुकल्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करतो. परंतु, तितक्यात घरातील पाळीव मांजर तिथे येते आणि बिबट्याच्या अंगावर उडी मारून, त्याला दूर करते. त्यानंतर एक महिला घरातून पळत तिथे येते आणि मुलाला घेऊन तिथून निघून जाते. हा धडकी भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @aikalaakari या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला १४ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “बाळाच्या आईचं लक्ष कुठे होतं.” दुसऱ्याने लिहिलेय, “बापरे! खूपच भयानक.” आणखी एकाने लिहिलेय, “हा व्हिडीओ AI तर नाही ना?”