Viral Video: अन्न, वस्त्र आणि निवारा ही प्रत्येक माणसाची मूलभूत गरज आहे. पण तरीही गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या मनात श्रीमंतीची भूक असते. आपण खूप श्रीमंत असावं, आपल्याकडे भरपूर सोनं, गाड्या, नोकर असावेत असे स्वप्न अनेकजण पाहतात. काहींचा जन्मच श्रीमंत कुटुंबात झालेला असतो ते मुळातच श्रीमंत असतात, पण काहींना श्रीमंत होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय ज्यात एका व्यक्तीने खूप मेहनतीने सोनं शोधून काढलं आहे.

लहानपणी अनेक परिकथांमध्ये सोन्याचा हंडा, गुप्तधन याबद्दल तुम्ही वाचलं असेल. पण नुकत्याच समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये ही घटना खरोखर झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून यावर नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @insta_trending_vaieral या अकाउन्टवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती जंगलात जमिनीखाली काहीतरी खोदताना दिसत आहे, यावेळी तो तिथे मेटल डिटेक्टर बीप वाजवण्यास सुरुवात करतो, जे जमिनीखाली काही धातू असल्याचे संकेत देते. बराच वेळ जमीन खोदल्यानंतर त्याला अचानक तिथे सोन्याच्या काही वस्तू सापडतात. त्यानंतर तो पुन्हा ती जमीन आणखी खोदतो. तेव्हा त्याला आणखी काही दागिने सापडतात.

हेही वाचा: झिंग झिंग झिंगाट! चिकनचा तुकडा पाहून कुत्र्याने केला हटके डान्स; VIDEO पाहून पोट धरून हसाल

पाहा व्हिडीओ:

या व्हिडिओला आतापर्यंत आठ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून १० हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाइक केले आहे. तसेच अनेक युजर्सही यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. काहींना हा व्हिडीओ पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर अनेकांनी या व्हिडीओला फेक असल्याचे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अकाउन्टवर यापूर्वीही असे अनेक व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती अशाच प्रकारच्या गुप्त गोष्टी खोदण्यासाठी प्रसिद्ध असल्याचं म्हटलं जात आहे.