सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे जिथे कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. याच सोशल मीडियावर सध्या झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. डिलिव्हरी बॉय जेव्हा ऑर्डर घेऊन येतो त्यावेळी त्याचं ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं, ते पाहून तुम्ही कौतूक कराल.

आपल्या जेव्हा बाहेरचं काही खायची इच्छा झाली तर घरबसल्या आपण ऑनलाइन फूड ऑर्डर करतो. भूक लागलेली असताना फूड डिलिव्हरी घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयची आपण देवासारखी वाट पाहतो. जेव्हा डिलिव्हरी बॉय आपली ऑर्डर घेऊन येतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर जो आनंद झळकतो त्याला कसलीच तोड नाही. अशाच एका व्यक्तीने डिलिव्हरी बॉयचं हटके स्टाईलने स्वागत केलंय.

आणखी वाचा : डोळ्यात अश्रू… हातात दिवंगत वडिलांचा फोटो घेऊन नवरी मंडपात आली, पाहा भावूक VIRAL VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने मागवलेले पार्सल घेऊन झोमॅटोचा एक डिलिव्हरी बॉय दिलेल्या पत्त्त्यावर येतो. दोन्ही हातात पार्सल घेऊन हा डिलिव्हरी बॉय आलेला पाहून या व्यक्तीला इतका आनंद झाला की चक्क गाणं गात तो डिलिव्हरी बॉयचं स्वागत करताना दिसतो. या व्यक्तीला आपल्या स्वागतासाठी गाणं गाताना पाहून झोमॅटो डिलिव्हरी बॉय सुरूवातीला गोंधळलेला दिसतो. हा व्यक्ती ‘आइये आपका इंतजार था’ हे गाणं गाताना दिसतोय. या व्यक्तीने चक्क हातात आरतीचं ताट घेऊन त्याचं औक्षण केलं. हे पाहून डिलिव्हरी बॉय हसतो आणि त्या व्यक्तीच्या स्वागताचं स्विकार करतो.

आणखी वाचा : उकडलेले अंडे सोलण्याची ही अनोखी आयडिया पाहून हैराण व्हाल! पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘व्हेन पॉप्स इज द बॉस’! पायलट बाप-लेकाची जोडी एकत्र उड्डाण करतानाचा VIDEO VIRAL

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ संजीव कुमार नावाच्या व्यक्तीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिण्यात आलीय. ‘जेव्हा आपण चार तास वाट पाहतो’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १.९ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ७९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.