Viral Video: एखाद्या सापाचा फोटो जरी आपल्या डोळ्यांसमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. नाग, मण्यार, अजगर या सापांमधील जातींना अनेक जण घाबरतात यात काही नवल नाही. काही महिन्यांपूर्वी परदेशातील एका अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात तो अजगर एका गाडीच्या मागच्या बाजूला अडकल्याचे दिसत होते. त्या व्हिडीओनंतर व्हायरल झालेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये एक नागीण आपल्या अंड्यांचे रक्षण करताना दिसली होती. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असाच एक खूप भयानक नाग चक्क फ्रिजमध्ये शिरल्याचे पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरातील फ्रिजमध्ये चक्क नाग फणा काढून बसल्याचे दिसत आहे. हा नाग फ्रिजमध्ये कसा पोहोचला हे जरी या व्हिडीओतून कळत नसलं तरी, फ्रिजमध्ये बसलेल्या नागाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @punecitylive.news.pune या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्यावर आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Pune City Live (@punecitylive.news.pune)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकानं लिहिलंय, “अगोबाई नवीनच काहीतरी”. तर दुसऱ्यानं लिहिलंय, “अंगावर काटा आला हे पाहून”. तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “किती भयानक आहे”. आणखी एका युजरनं लिहिलंय, “बापरे तो आत कसा गेला”.