Viral Video: हत्ती जितका शांत, तितकाच तो रागीट प्राणी आहे. अनेकदा आपण हत्तीचे रौद्र रूप पाहिलेय. मग तो रागात कधी माणसांवर हल्ले करताना दिसतो; तर कधी शेतात धुडगूस घालताना. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हत्तीचा संयम पाहून तुम्हालाही काही क्षण आश्चर्य वाटेल.सोशल मीडियामुळे आपण जगभरातील अनेक विविध व्हिडीओ काही क्षणांत पाहू शकतो. त्यावर रिल्स, व्हिडीओ यांच्यासोबतच प्राण्यांचेही विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून आपले मनोरंजन होते; तर काही व्हिडीओंमुळे आपल्याला वाईटही वाटते. या व्हायरल व्हिडीओत कधी वाघ हरणाची शिकार करताना दिसतो; तर कधी चक्क कुत्राच वाघाला खुन्नस देताना दिसतो. त्यातील काही व्हिडीओ नेहमीच थरकाप उडवतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होतोय. ज्यात जंगलातील एका प्राण्याने हत्तीचा कान पळविल्याचे दिसत आहे; जे पाहून युजर्स हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत.
हत्ती जितका शांत, तितकाच तो रागीट प्राणी आहे. अनेकदा आपण हत्तीचे रौद्र रूप पाहिलेय. मग तो रागात कधी माणसांवर हल्ले करताना दिसतो; तर कधी शेतात धुडगूस घालताना. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हत्तीचा संयम पाहून तुम्हालाही काही क्षण आश्चर्य वाटेल.
हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलाचा आहे. त्यात तुम्ही पाहू शकता की, एक जंगली प्राणी चक्क हत्तीचा डावा कान तोंडात पकडून धावताना दिसत आहे. यावेळी हत्तीदेखील त्या प्राण्याच्या मागे धावताना दिसत आहे. यावेळी हत्तीकडे पाहून त्याला होत असलेल्या वेदनेची जाणीव होत आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करून प्रतिक्रिया देत आहेत. ज्यात एकाने लिहिलेय की, बिचाऱ्या हत्तीला किती त्रास होत असेल? दुसऱ्याने लिहिलेय की, हे खरं तर खूप वाईट झालं. आणखी एकाने लिहिलेय की, बापरे हे खूप भयानक आहे.
तर एकाने हा व्हिडीओ खोटा तर नाही ना? अशी शंका व्यक्त केली आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लीक करा:
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @karke_dekhte या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास तीन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि ४० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.
दरम्यान, याआधी व्हायरल झालेल्या एका बातमीमध्ये हत्तीने भामरागड तालुक्यातील हिदुर येथील एका महिलेवर हल्ला केला होता; ज्यात तिचा मृत्यू झाला होता. तसेच त्यांनी त्याच गावात धुडगूस घालून तीन महिलांना जखमी केले होते. तर, आणखी एका बातमीनुसार, केरळमध्ये एका मंदिर उत्सवात हत्ती बिथरले होते. त्यावेळीदेखील त्यांनी असाच धुडगूस घातला होता.