scorecardresearch

Video: अंतराळात महिला करत होती योगा, शून्य ग्रॅव्हिटीमध्ये असं काही झालं की..पृथ्वीवासी झाले थक्क

Shocking Video: कॉस्मिक किड्स या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सर्वांनाच थक्क करत आहे.

Video: अंतराळात महिला करत होती योगा, शून्य ग्रॅव्हिटीमध्ये असं काही झालं की..पृथ्वीवासी झाले थक्क
Viral Video Astronaut Performs Yoga in Zero Gravity (फोटो: ट्विटर)

Shocking Viral Video: असं म्हणतात योगासने ही दिवसातून कधीही केली तरी लाभदायकच ठरतात. इतकंच काय तर सहसा जेवल्यावर व्यायाम करू नये असं सांगणारेही वज्रासनाचे फायदे नाकारू शकत नाहीत. योगामुळे मानसिक, शारीरिक व अध्यात्मिक तीन योग जुळून येतात त्यामुळे वेळेचे, जागेचे बंधन त्याला लागूच होत नाही. याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक अंतराळवीर चक्क अंतराळात योगा करताना पाहायला मिळते. कॉस्मिक किड्स या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सर्वांनाच थक्क करत आहे. शून्य गुरुत्वाकर्षणात अंतराळवीर चालूही शकत नाहीत तिथे योगा कसा केला याविषयी सर्वांना कुतुहूल वाटत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, युरोपियन स्पेस एजन्सीमधील अंतराळवीर समंथा क्रिस्टोफोरेटी शून्य गुरुत्वाकर्षणात काही योगासने करताना दिसत आहेत. समंथा या व्हिडिओमध्ये प्रशिक्षकांसह ऑनलाईन वर्गात योगा शिक्षण घेत आहे. ‘गरुडासन’ किंवा ‘गरुड योग’ पोझिशन करताना समंथा दिसत आहे.

दरम्यान, कॉस्मिक किड्स ही योगाच्या फायद्यांचा प्रचार करणारी संस्था आहे. “शून्य गुरुत्वाकर्षणात वजन हीन अवस्थेत योगा करणे हे कठीण आहे मात्र योग्य प्रशिक्षणासह काहीच अशक्य नाही असे कॅप्शन या पोस्टला दिलेले आहे. या कॅप्शनची प्रचिती व्हिडिओमध्ये दिसून येतेच .

Navratri 2022: आदिशक्तीच्या जागरात ‘ती’ला प्रवेश नाही; नवरात्रीत ‘या’ मंदिरात महिलांना मनाई का घातली जाते?

स्पेसमध्ये योगा व्हायरल व्हिडीओ

इथे जमिनीवर व्यायाम करायला आम्ही कंटाळा करतो पण तिने अंतराळात योग केला आणि योग्य केला हे पाहून आम्हीहीप्रेरित झालो आहोत अशा कमेंट्स काहींनी या व्हिडीओवर केलेल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आणि आता तुम्ही कधीपासून योगाभ्यास सुरु करताय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या