Viral Video: अनेक सामान्य घरांतील महिलांचे आयुष्य फक्त चूल आणि मूल सांभाळण्यातच जाते. परंतु, प्रत्येक महिलांनाही एखादा छंद असतो, ज्याची ओळख अनेकदा त्यांनाही नसते. काहींकडे चविष्ट जेवण बनवण्याची कला, तर काहींकडे सुंदर रांगोळी, विणकाम, मेंदी काढण्याची कला असते. तर, काही जणींचा आवाज खूप गोड असतो. परंतु, त्यांच्यातील हे गुण परिस्थिती आणि जबाबदाऱ्यांच्या कचाट्यात अडकून पडतात. पण, हल्ली सोशल मीडियामुळे अनेकींना आपल्यातील त्या कलेची जाणीव होऊ लागली आहे. घरच्या जबाबदारीसह वेळात वेळ काढून काही हौशी महिला आपल्यातील कला सादर करताना दिसतात. आता अशाच एका महिलेचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एखादं नवीन गाणं असो किंवा जुनी गाणी असो एखादं गाणं खूप चर्चेत आलं की, अनेक युजर्स त्यावर रील्स बनवतात. सध्या एका महिलेचा असाच एक डान्स व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल.

पाहा व्हिडीओ:

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला तिच्या घरामध्ये ‘लत लग लयी’ गाण्यावर डान्स करत आहे. तिच्या डान्समधील स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

हा व्हिडीओ इन्टाग्रामवरील @deepali_akash_saras या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि तीन हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एकानं कमेंटमध्ये लिहिलंय, “अप्रतिम नृत्य सादरीकरण”. दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “खूप खूप छान ताई.” आणखी अनेकांनी त्यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे.