Unique Name Reveal Ceremony Viral Video : घरात एखादी गरोदर महिला असेल, तर बाळ जन्माला येईपर्यंत घरात एक वेगळाच उत्साह असतो. बाळ जन्माला आले की, मग त्याचे नाव काय ठेवायचे याबद्दल चर्चा सुरू होते. एकदा नाव ठरले की, मग थाटामाटात बारसे केले जाते. बारशाला आलेल्या सगळ्या पाहुणेमंडळींसमोर बाळाचे नाव अगदी अनोख्या स्टाईलमध्ये सगळ्यांसमोर ठेवले जाते. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्ही थक्क होऊन जाल आणि असे बारसे पहिल्यांदाच बघितले, असे म्हणाल.
अनेकदा बारशाला बदाम, पाने, फुले किंवा कार्टूनच्या आकारात लहान मुलांनी नावे लिहिली जातात. मग त्यावर लावलेला कागद काढून नाव सगळ्यांना सांगितले जाते. पण, आज एका कुटुंबाने नावाचा अर्थ आणि नावामागची एक प्रसिद्ध गोष्ट सांगत चिमुकल्याच्या नावाची घोषणा केली आहे. स्टेजवर आई आणि बाबा त्यांच्या बाळाला घेऊन उभे आहेत. महाभारतातील अर्जुनाच्या प्रतिष्ठित धनुर्विद्या चाचणीचे दृश्य चिमुकल्याचे नाव सांगण्यासाठी वापरण्यात आले आहे. अर्जुनाने तलावातील माशाच्या प्रतिबिंबाकडे पाहत धनुष्याची प्रत्यंचा खेचून हळुवारपणे बाण माशाच्या दिशेने सोडला आणि मग तो बाण अचूकपणे माशाच्या डोळा भेदतो.
नाव गोष्टीसह सांगण्याचा योग्य मार्ग (Viral Video)
त्यानंतर हळुवारपणे एक पडदा खाली येतो. या पडद्यावर बाळाचे नाव ‘पार्थ’ असे लिहून येते, जे पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येते. तर, पार्थ हे अर्जुनाचं खरे नाव आहे. पार्थ या नावाचा अर्थ एकाग्रता, धैर्य आणि नियती किंवा जीवनाचं उद्दिष्ट असा होतो. म्हणजेच नाव सांगण्याचा हा साधा क्षणही रीतीरिवाज, परंपरा आणि छान गोष्ट सांगण्याच्या भावनेने भरलेला आहे आणि हे दाखविणारा हा व्हिडीओ अनेकांना खूप मोठ्या प्रमाणात आवडला आहे. बारशाचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये व्हिडीओचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच नेटकरी व्हिडीओ पाहून “पृथ्वीवर तुमचे स्वागत आहे पार्थ”, “बाळाचं नाव सांगण्याची ही पद्धत पहिल्यांदाच बघितली आहे”, “खूप छान नाव आहे”, “श्रीकृष्णाने अर्जुनाला पार्थ म्हटले आणि अर्जुनाने तलावातील प्रतिबिंब पाहून माशाच्या डोळ्यावर वार केला. नाव गोष्टीसह सांगण्याचा हा खरोखरच योग्य मार्ग आहे” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहेत.
