Viral Video Baby Shower Dance Performance For Teacher : गृहिणीशिवाय घराला घरपण लाभत नाही असे म्हणतात. एकेकाळी रांगत रांगत जमिनीवर चालणारी चिमुकली अगदी एकेदिवशी संपूर्ण घराची जबाबदारी घ्यायला सुरुवात करते; हे पाहून आपल्याही डोळ्यांत पाणी येते आणि स्त्रियांच्या प्रवासाची एक झलक नकळत डोळ्यासमोर येते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमात काही चिमुकल्यांनी स्त्रीचा प्रवास सांगणाऱ्या गाण्यावर जबरदस्त डान्स केलेला दिसतो आहे.

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, “कुणीतरी येणार येणार गं” या गाण्यावर डोहाळेजेवणात हमखास डान्स केला जातो. पण, आज काही लहान मुलींनी डोहाळे जेवणाच्या दिवशी त्यांच्या शिक्षिकेला खास सरप्राईज दिले आहे आणि स्त्रीचा प्रवास सांगणाऱ्या “जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा” या गाण्यावर अनोखा डान्स केला आहे. शिक्षिका स्टेजवर बसली आहे आणि सगळ्या विद्यार्थिनी अगदी गाण्याच्या तालावर सुंदर स्टेप्स करताना दिसत आहे; जे पाहून तुमच्या तुमच्याही डोळ्याचे पारणे फेडले जाईल.

“जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा” (Viral Video)

स्त्रियांच्या आयुष्यातील मुलगी, ताई, आई आणि मग आजी असा आयुष्याच्या प्रत्येक टप्पा हा सुंदर असतोच. पण, आई होणे हा महिलांच्या जीवनातील सुंदर अनुभव असतो. कुटुंबातील महिला गरोदर असेल तर संपूर्ण कुटुंबच तिचे लाड, हट्ट पुरवतात. पण, आज या चिमुकल्या मुलींनी शिक्षिकेचा आई होण्यापर्यंतचा प्रवास गाणं आणि डान्सद्वारे मांडून आई होण्याचे कौतुक केले आहे. मुलींनी शिक्षिकेच्या डोहाळे जेवणासाठी केलेला जबरदस्त डान्स व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ s.s_dance_studio_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमात मॅमसाठी खास सरप्राईज” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “ह्या लहान मुलींच्या आई-वडिलांनी ह्या परफॉर्मन्समध्ये आपल्या मुलींचं संपूर्ण आयुष्य बघितलं असेल”, “उत्तम सादरीकरण” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.