India’s first woman bartender Viral Video : तुम्ही कधी फॅमिली रेस्टॉरंट ॲण्ड बारमध्ये गेला असाल किंवा अनेकदा त्याबाबत चित्रपटांमध्ये पाहिले असेल की, बार टेंडर्स अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने कॉकटेल बनवताना दिसतात. ते पाहून लोकही आश्चर्यचकित होतात. त्यासाठी बार टेंडर्स खूप प्रॅक्टिस करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर, जे ड्रिंक्स बनवतात आणि सर्व्ह करतात, त्यांना ‘बार टेंडर्स’, असे म्हणातात. पण, कधी कधी त्यांनी दाखवलेली कौशल्ये धडकी भरवणारीही असतात; तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात उतरून कर्नाटकातील फ्लेअर बार टेंडर कविता मेधरने स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आहे. एका लहानशा गावातून आलेल्या कविताने आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी बार टेंडर्सचा व्यवसाय स्वीकारला आणि फ्लेअर बार टेंडर्सची कला आत्मसात करणाऱ्या भारतातील पहिल्या महिलांपैकी एक ठरली. पब, रेस्टॉरंटमध्ये आलेल्या ग्राहकांचे मनोरंजन करण्यासाठी बाटल्यांचे सादरीकरण हे मनोरंजन करण्यासाठी केले जाते.

पण, जर काही चूक झाली असती तर… (Viral Video)

पण, आज भारतातील पहिल्या महिला बार टेंडर कविता मेदारचा नवरात्रीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यामध्ये एकीकडे कंबरेवर चिमुकल्याला घेऊन, दुसऱ्या हातात तिने बाटल्या धरल्या आहेत; या बाटल्यांवर ज्वाळा येत आहेत. जळत्या बाटल्या हवेत उडवून, ती कौशल्य दाखवते आहे; ज्याला ‘फ्लेअर बार टेंडिंग’ असे म्हणतात. सगळ्यात पहिला चिमुकल्याला घेऊन, त्यानंतर एकटी उभी राहून जळत्या बाटल्या हवेत उडवण्याचे कौशल्य दाखवताना दिसते आहे; जे पाहून गरबा सोडून सगळेच कविता मेदारकडे पाहताना दिसत आहेत. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @kavitamedar28 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक युजर्सनी तिच्या कौशल्याचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक केले; तर काहींनी या कृतीचा निषेध केला आणि “लहान मुलाबरोबर असे व्हिडीओ बनवू नये”, “मला तिचे कौशल्य आवडले; पण मुलाचा जीव धोक्यात घालणे खूप जास्त चुकीचे आहे”, “कौशल्याला सलाम; पण जर काही चूक झाली असती, तर पश्चात्तापाने परिस्थिती पूर्ववत होऊ शकली नसती” आदी अनेकविध कमेंट्स युजर्सनी केल्या आहेत.