Viral Video Bihar Woman Creates Scene At Station With TTE : सध्या सोशल मीडियावर बिहारच्या एका शिक्षिकेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एसी ट्रेनने प्रवास करणाऱ्या या महिलेकडे तिकीट नाही. त्यामुळे टीटीई महिलेला कोचमधून निघून जाण्याची नम्रपणे विनंती करतो. पण, महिला उर्मटपणे उत्तर देत तिलाच त्रास दिल्याचा आरोप टीटीईवर करताना दिसते आहे. इथपर्यंतच ही महिला थांबत नाही, तर जेव्हा ट्रेन समस्तीपूर रेल्वेस्थानकावर थांबते तेव्हा ती स्थानकावर उतरून, कुटुंबातील सदस्यांना बोलावून भांडण करतानाही दिसते.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ४ ऑक्टोबर रोजी देवरियातील रामगुलाम टोला येथील रहिवासी आणि सरकारी शाळेतील शिक्षिका असलेली ही महिला रांची-गोरखपूर एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक १८६२९)च्या एसी कोचमधून प्रवास करीत होती. ही महिला सिवानहून गोरखपूरला (Siwan to Gorakhpur) प्रवास करीत असताना टीटीईने तिला तिचे तिकीट दाखवण्यास सांगितले. महिलेकडे तिकीट नसल्यामुळे टीटीईने रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली. तेव्हा महिलेने त्याचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मग तिकीट तपासनीसाने ताबडतोब नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
अनेक वेळा तिकिटाशिवाय पकडलंय (Viral Video)
त्यानंतर पुढच्या देवरिया स्थानकावर ट्रेन थांबवण्यास सांगितली. महिलेने तिच्या वडिलांना आणि इतर नातेवाइकांना बोलावले, जे स्थानकावर आले आणि त्यांनी अधिकाऱ्यांसमोर गोंधळ घातला. महिला टीटीईला जीवे मारण्याची धमकी देताना दिसते. या सगळ्या प्रकारात टीटीईनेच त्या महिलेशी गैरवर्तणूक केल्याचेसुद्धा ती महिला सांगताना ऐकू येते. महिलेचे बोलणे ऐकून यापूर्वी अनेक वेळा तिकिटाशिवाय प्रवास करताना पकडण्यात आले होते, असाही खुलासा तिच्या या भांडणाद्वारे झाला आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
आरपीएफ कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती अखेर नियंत्रणात आली. पण, प्रकरण तिथेच संपले नाही. दुसऱ्याच दिवशी तीच महिला पुन्हा एकदा तिकिटाशिवाय प्रवास करताना पकडली गेली. त्यावेळी टीटीईने तिला दंड ठोठावला आणि आवश्यक तो दंड भरल्यानंतर तिला निघून जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे इंडिया तिकीट तपासणी कर्मचारी संघटनेने नंतर सोशल मीडियावर ही घटना पोस्ट केली आणि म्हटले की, सुरुवातीच्या भांडणादरम्यान महिलेने ट्रेनमध्ये असणारी साखळी ओढण्याचाही प्रयत्नही केला होता. तर, सोशल मीडियावर या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे आणि नेटकरीही संताप व्यक्त करताना दिसून आले आहेत.