Viral Video Boy Calls Police After Mother Denies 20 Rupees : लहान मुले आणि त्यांचे हट्ट यांचा काहीच नेम नसतो. कधी कधी ही मुले रागावून जोरजोरात रडायला लागतात, बाजारात जमिनीवर झोपतात, आई-वडिलांवर हात उचलतात त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन जाते. मग पालक अनेकदा मुलांना मारतात. तर आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये चक्क हट्ट पुरवले नाही म्हणून चिमुकल्याने पोलिसांना फोन केला आहे. तसेच हा हट्ट नेमका काय होता हे ऐकून तर तुम्हाला नक्कीच हसू येईल.
मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून एक विचित्र पण गोंडस घटना समोर आली आहे. एका ८ वर्षाच्या मुलाने त्याच्या आईकडे २० रुपयांचे कुरकुरे खायला मागितले. पण, आईने त्याला पैसे देण्यास नकार दिला आणि मारले सुद्धा. मग चिमुकल्याने पोलिसांना फोन केला. चिमुकल्याने ११२ वर फोन करून आई आणि बहिणीने त्याला दोरीने बांधून मारहाण केली असे रडत रडत पोलिसांना सांगितले. रडत केलेली तक्रार ऐकून पोलिसांनी चिमुकल्याच्या घरी धाव घेतली आणि पुढे काय घडलं ते तुम्हीच बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
मॉडर्न समस्येवर मॉडर्न उपाय (Viral Video)
मिळालेल्या माहितीनुसार, ही मजेशीर घटना कोतवाली पोलिस ठाण्याच्या खुटर चौकीच्या हद्दीत येणाऱ्या चित्रवाई कला गावात घडली. पोलिसाने नम्रपणे समजावून सांगितले आणि मुलाला शांत केले. त्यानंतर पोलिस पथकाचे उमेश विश्वकर्मा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुलाला आणि त्याच्या आईला बोलावून समजावून सांगितले आणि मुलाला असे मारहाण करू नका असा सल्ला दिला. त्यांनी मुलासाठी कुरकुरे देखील विकत घेतले; ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हसू आले.
पोस्ट नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “२० रुपयांचे कुरकुरे न मिळाल्याने मुलाने पोलिसांना फोन केला” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी भरपूर खुश झाले आहेत आणि “मॉडर्न समस्येवर मॉडर्न उपाय”, “पोलिस कुरकुरे घेऊन घरी गेले… खरोखरच पोलिसांची एक अतिशय संवेदनशील बाजू दाखवण्यात आली” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…
