Boys Hair Catches Fire During Birthday Celebration : वाढदिवस साजरा करणे कोणाला नाही आवडत. काही जणांना एक वर्ष कमी झाल्याची खंत, तर अनेक जणांना प्रत्येक वर्षी हा दिवस आनंदात साजरा करण्याचा उत्साह असतो. पण, असे काही असले तरीही हा दिवस प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करतोच. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे की, त्यामध्ये अतिउत्साहात वाढदिवस साजरा करणे महागात पडले आहे आणि त्याच्या केसांनी पेट घेतला आहे.
व्हायरल व्हिडीओत एका तरुणाचा वाढदिवस साजरा केला जातो आहे. वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी, केकवर लावलेल्या स्पार्कल कॅण्डल त्याने हातात घेतल्या. मेणबत्तीच्या मदतीने स्पार्कल कॅण्डल जळवून डोक्याजवळ नेऊन जोरजोरात फिरवत होता. अगदी त्याच वेळी कोणतरी स्नो स्प्रे मारला. स्प्रे मारल्यामुळे पांढरा फेस वाढदिवस असणाऱ्या तरुणाच्या तोंडावर आणि केसावर उडाला. यादरम्यान स्पार्कल कॅण्डलची आग त्या पांढऱ्या फेसाला लागली आणि आगीचा भडका उडाला.
लोक खबरदारी का घेत नाहीत (Viral Video)
व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, वाढदिवस असणाऱ्या तरुणाने स्पार्कल कॅण्डल फिरवण्याची आणि तिथे उपस्थित अज्ञात व्यक्तीने स्नो स्प्रे मारण्याची वेळ एक झाल्यामुळे वाढदिवस असणाऱ्या तरुणाच्या केसांना आग लागली. तरुणाच्या केसांना आग लागताच तरुणाच्या बाजूला उपस्थित दोन्ही महिलांनी केसांनी पेट घेतलेली आग विझवली. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली नाही आणि मोठी दुर्घटना होता होता टळली. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा बघाच…
व्हिडीओ एकदा बघाच…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @u/flukerecords या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून ज्वलनशील पार्टी फोमच्या वापराबाबत टीका केली आणि “बेपर्वा”, “स्प्रे आणि स्पार्कल कॅण्डल एकाच वेळी कशाला वापरलं”, “त्या स्प्रेमुळे आधीच इतक्या घटना घडल्या आहेत”, “मला माहीत नाही की लोक डिस्क्लेमर का वाचत नाहीत आणि खबरदारी का घेत नाहीत” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्याचे दिसत आहेत.