Viral Video Break Dance Swing Broke Mid Ride : एखादी जत्रा, मॉल किंवा एखाद्या रिसॉर्टमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी विशेष गेम झोन असतो, जिथे अनेक प्रकारचे खेळ, राईड उपल्बध असतात. त्यामध्ये सध्या छोटे इंजिनचे डबे असणारी राईड, तर ब्रेकडान्स राईड तर अगदी सगळ्यांनाच आवडते. पण, अनेकदा राईड्स पाहून या तुटणार तर नाहीत ना, अशी भीती अनेकांच्या मनात येते. सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे की त्यामध्ये राईडदरम्यान एक डबा तुटतो आणि भयानक दृश्य पाहावयास मिळते.
व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण, ब्रेकडान्स राईडमध्ये अनेक जण अगदी आनंदाने बसलेले दिसत आहेत. त्यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांचा समावेश आहे. बघता बघता ब्रेकडान्स राईड सुरू होते आणि एक डबा अचानक तुटतो आणि आतमध्ये बसलेल्या दोन्ही लोकांचा जीव धोक्यात जातो. ब्रेक डान्स राईड गोल गोल फिरत असल्यामुळे तो तुटलेला डबा खाली पडून डब्यासह ती माणसे गोल गोल फिरू लागतात. हे पाहून परिस्थिती हाताळण्यासाठी काही जण पुढे येतात.
नशिबाने वाचला जीव (Viral Video)
परिस्थिती पाहून अनेक जण दोन्ही माणसांचा जीव वाचवण्यासाठी धाव घेतात. तुटलेला डबा पुन्हा गेटजवळ येईपर्यंत ते वाट बघतात आणि दोघांनाही सुखरूप बाहेर काढतात. ब्रेकडान्स राईड ऑपरेट करणाऱ्यांनी राईड सुरू होण्यापूर्वी प्रत्येक डब्याची आणि बसलेल्या प्रत्येक ग्राहकाच्या सुरक्षेबद्दल तपासणी करायला हवी होती. कारण – ब्रेकडान्स राईड वेळेत थांबवली नसती किंवा कदाचित परिस्थिती हाताबाहेर गेली असती, तर भयानक दुर्घटना घडली असती. एकदा बघाच हा भयानक व्हायरल व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ajaysharma.aap या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘ब्रेकडान्स राईड तुटली; पण नशिबाने वाचले जीव’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा घाबरले आहेत आणि “आता परत कधी या राईडमध्ये बसणार नाही”, “जे आवडतं तेच नेहमी धोका देतं”, “तो पडला; पण भीती मला वाटते आहे”, “नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे हा” आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.
