Viral Video: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर चार्ल्स तिसरे यांना अधिकृतपणे ब्रिटनचे राजे म्हणून घोषित करण्यात आले आहे. सेंट जेम्स पॅलेसमध्ये शनिवारी हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या ७० वर्षांच्या शासन काळानंतर त्यांचे मोठे पुत्र चार्ल्स आता ब्रिटनचे सम्राट बनले आहेत. पण ही नवी जबाबदारी सांभाळताना राजे चार्ल्स यांची अनेकदा चिडचिड होत आहे. निदान सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तरी हेच चित्र दिसतंय.

राज्याभिषेकाच्या अधिकृत सोहळ्यात सुरक्षा रक्षकांवर चिडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यानंतर आता एका पत्रावर सही करतानाही राजे चार्ल्स गोंधळले. हिल्सबरो कॅसल येथे कॅमेऱ्यांसमोर अभ्यागतांच्या पुस्तकावर स्वाक्षरी करताना, राजे चार्ल्स व राणी कॅमिला पार्कर बाउल्स दिसून येत आहे. सुरुवातीला, त्यांनी चुकीची तारीख टाकून स्वाक्षरी केली ज्यानंतर ते वैतागले आणि पुन्हा तारीख बदलत असताना पेनची शाई त्यांच्या अंगावर सांडली, ज्यामुळे ते आणखीनच वैतागले.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
What Kangana Said?
कंगना म्हणाली, “सुभाषचंद्र बोस देशाचे पहिले पंतप्रधान होते, त्यांना..”; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?

Queen Elizabeth II यांचा मुकुट लग्नातच तुटला आणि..एलिझाबेथ द्वितीय यांच्या आयुष्यातील खास क्षण पाहा

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की राणी कॅमिला शाई पुसताना चार्ल्स आणखीनच अस्वस्थ होत आहेत, शेवटी “मला हे सगळं सतत सहन करायला जमणारच नाही असे म्हणून चार्ल्स निघून जातात.

राजे चार्ल्स चिडले

राजे चार्ल्स तृतीय हे येत्या दिवसात इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड या देशांना भेट देणार आहेत. उत्तर आयर्लंडमधील राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान बेलफास्टजवळील हिल्सबरो कॅसलभोवती शेकडो लोक जमले.

दरम्यान, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्कारास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहून भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यासाठी राष्ट्रपती १७ ते १९ सप्टेंबरदरम्यान लंडन दौरा करतील.