Viral Video Bus Driver Stops Vehicle : भारतात प्रत्येक सण साजरा करण्याची एक अनोखी पद्धत पहायला मिळते. सणांच्या दिवसांत सगळीकडे वातावरण खूप उत्साही, आनंदी असते. पण, दुसरीकडे सण प्रत्येकासाठी सारखा नसतो ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी असते. दैनंदिन गरजा पुरवल्या जाणाऱ्या सेवा, सार्वजनिक वाहतूक दुकान मालक, बस चालक आदी बऱ्याच लोकांना या सणांदरम्यान सुट्टी नसते. पण, याचे दुःख न करता, काम करताना सुद्धा ही माणसे या सणांचा आनंद घेताना दिसतात. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर अनेक जण अगदी ढोल-ताश्यांवर डान्स करताना दिसत आहेत. यादरम्यान सगळे नाचत आहेत हे पाहून चालकाने बस रस्त्यात थांबवली आणि त्याच्या फोनमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर ढोल-ताश्यांवर नाचणाऱ्यांसह तोही बसमध्ये बसून आनंद लुटू लागला. नाही तर काही काही बस चालक ट्रॅफिक जाम होत आहे म्हणून जोरजोरात हॉर्न वाजवण्यास सुरुवात करतात. पण, या बस चालकाने सगळ्यांनाच थक्क करून सोडले.

“ड्रायव्हर होणं सोपं नाही” (Viral Video)

आपल्याला एखाद्या सणात, कार्यक्रमात सहभागी होता येत नसेल; तर इतरांनाच मूड खराब न करता त्यांच्या आनंदात नकळत कसे सहभागी व्हायचे यासाठी प्रयत्न करण्यातच खरं सुख असते. बस चालकाने तसेच काहीतरी केलं आहे. आपल्याला जबाबदारीमुळे, नोकरीमुळे मिरवणुकीत सहभागी होता येत नव्हते म्हणून त्याने इतरांचा मूड खराब केला नाही. बस रस्त्यात थांबवली आणि त्याने इतरांच्या आनंदात नकळत सहभागी झाला. व्हायरल होणारा हा व्हिडीओ तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @atishg02 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तसेच “सण तर त्यांचा पण आहे” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “ड्रायव्हर होणं सोपं नाही”, “सण आणि त्यांचा आनंद घेण्याचा हक्क त्यांनाही आहे, पण, जबाबदारी पण आहे” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.