Viral Video Bus Driver Caught On Camera : गावी जाण्यासाठी आपण एसटी, ट्रेन वगळून लक्झरी बसला जास्त प्राधान्य देतो. कारण हा बसचा प्रवास अगदी आरामदायी असतो. पण, रात्रीच्या दरम्यान गाडी चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते. विशेषतः जेव्हा तुम्ही रात्री गाडी चालवता. कारण त्या बस चालकाच्या हाती बसमध्ये बसलेलता प्रवाशांची जबाबदारी असते. तर आज व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, बस चालकाने अशा पद्धतीने गाडी चालवली की, तुम्हाला लक्झरी बसमध्ये प्रवास करताना झोप येणार नाही आणि रात्री तुम्ही तुमच्या बस चालकाची तपासणी देखील कराल.
गाडी चालवताना, वाहन नियंत्रित करण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण लक्ष विचलित झाल्यामुळे अनेकदा चुका होतात. झोप लागली की अपघात होतात. पण, कदाचित व्हिडीओतील बसचालकाला या गोष्टींची जराही पर्वा दिसत नाही आहे. एकीकडे बस चालवत तर दुसरीकडे त्याने पुढ्यात मोबाईलसुद्धा सुद्धा आहे. पण, बसचालकाच्या या एका चुकीमुळे सर्व प्रवाशांचे नुकसान झाले असते.
अपघात होण्याचे एकमेव कार (Viral Video)
रात्रीच्या वेळी लक्झरी बस चालवताना बस चालक त्याच्या फोनमध्ये बघताना दिसतो आहे. सहसा, असे बस चालक झोप येऊ नये म्हणून संगीत ऐकतात किंवा चहासाठी थांबतात. पण, व्हिडीओमध्ये, बस चालक , स्टीअरिंग व्हीलजवळील स्पीडोमीटरवर त्याचा फोन ठेवून, बसही चालवताना दिसतो आहे. तसेच यादरम्यान बस सुमारे ८० किलोमीटर वेगाने जात होती. ही घटना पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. बस चालकाचा व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा..
व्हिडीओ नक्की बघा…
बसमध्ये उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने हा प्रसंग स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @nandantwts या एक्स (ट्विटर)अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “अपघात होण्याचे एकमेव कारण” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. १९ सेकंदांचा हा फुटेज व्हायरल झाल्यानंतर, युजर्स त्यावर उत्साहाने प्रतिक्रिया देताना दिसले आहेत.
