Viral Video Cab driver And Women Passenger : कॅब ड्रायव्हर आणि प्रवाशांमध्ये कोणत्या गोष्टीवरून भांडण होतील काही सांगता येत नाही. टाळी एका हाताने वाजत नाही असे म्हणतात. म्हणजेच काही प्रवासी कॅब बुक केल्यानंतर ड्रायव्हरवर असा रुबाब झाडतात की, त्यांनी पैसे देऊन त्याला कामावर ठेवलं आहे. तर काही ड्रायव्हर स्वतःची गाडी असल्यासारखं प्रवाशांनना उलट-सुलट उत्तर देतात; त्यामुळे अनेकदा वाद होतात. तर आज सोशल मीडियावर अशीच पोस्ट व्हायरल होते आहे. ज्यामध्ये भांडण टोकाला गेल्यावर चूक नसणाऱ्याचाही संयम तुटतो तसेच काहीसे घडले आहे.

डॅशकॅम फुटेजमध्ये एक घटना रेकॉर्ड झाली आहे. राइड बुक करताना ॲपमध्ये जिथपर्यंत पत्ता दिला होता, तिथपर्यंतच ड्रायव्हरने प्रवासी महिलेला सोडले.पण, महिला प्रवासी त्यापुढे चल म्हणाली आणि चालकाने जाण्यास नकार दिला. तेव्हा प्रवासी महिलेने पैसे न देता निघून जाण्याची धमकी दिली, ड्रायव्हरशी वाद घालण्यास सुरवात केली. त्यामुळे ड्रायव्हरने सुद्धा तिला कोणतीही विनंती न करता पैसे न देता जायचं असेल तर जाऊ शकता असे मुद्दाम ठणकावून सांगितले. हे ऐकल्यानंतर महिला आणखी संतापलेली दिसते आणि ड्रायव्हरवरवर हट्टी असल्याचा आरोप करत मला पाहिजे त्या ठिकाणी का सोडत नाही आहेस असे आवर्जून विचारते.

ही हुशारी नाही तर अहंकार आहे (Viral Video)

तेव्हा ड्रायव्हर “जर लोकेशन इथपर्यंतच आहे तर मी आतमध्ये का सोडू आणि हो तुम्हाला १३२ रुपये नाही द्यायचे आहेत. तर ठीक आहे. १३२ रूपांनी मी किंवा तुम्ही श्रीमंत नाही होणार आहे” ; असे म्हणाला आहे. यावर प्रवासी महिला म्हणाली की, “इतर सर्व ड्रायव्हर तिला आत सोडतात. पण, कॅब ड्रायव्हरने त्याच्या भूमिकेपासून हटण्यास नकार दिला.“माहिती नाही कोणत्या चुकीच्या वेळेत मी कॅब बुक केली”, हे ऐकल्यानंतर तर ड्रायव्हर महिला प्रवाशाला नम्रपणे बोलण्यास सांगतो आणि इथेच व्हिडीओचा शेवट होतो.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ Reddit आणि एक्स (ट्विटर) या दोन्ही अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून काही जण कॅब ड्रायव्हरला पाठिंबा देत आहेत तर अनेक जणांनी महिलेची बाजू घेतली आहे. “प्रवास केल्यानंतर पैसे देण्यास नकार देणे ही हुशारी नाही तर अहंकार आहे. अशा वर्तनाची स्वतःलाच लाज वाटली पाहिजे” , “ड्रायव्हर त्याच्या जागी बरोबर आहे. जेव्हा ड्रॉप ऑफ लोकेशन आधीच दिलं आहे तर ड्रायव्हरला दुसरीकडे कुठेतरी सोडण्यास भाग का पाडायचे?”, “तिने त्याला नम्रपणे विचारले असते तर तो नक्कीच सोडायला तयार झाला असता”, “ड्रायव्हरने परिस्थिती अतिशय समंजसपणे हाताळली,” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.