पोरसा सामुदायिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व ड्रेसर्सचा घोर निष्काळजीपणा समोर आला आहे. वृद्ध महिलेला मलमपट्टी करताना कापसाऐवजी कंडोमचे पॅकेट बांधून तिला मुरैना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. मुरैना जिल्हा रुग्णालयाच्या ड्रेसिंग रूममध्ये डॉक्टरांनी पट्टी उघडली असता त्यात कंडोमचे पाकीट चिकटलेले आढळले. आता या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सीएमएचओने तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
धर्मगढ गावातील एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या जखमेतून होणारा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी कंडोमच्या आवरणाचा वापर तात्पुरती मलमपट्टी म्हणून करण्यात आला होता. या महिलेचे नाव रेश्माबाई असे आहे. मुरैना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रेश्माबाईंच्या जखमेचे ड्रेसिंग बदलण्यास सुरुवात केल्यावर ही घटना उघडकीस आली. तिला जिल्ह्यातील सामुदायिक आरोग्य केंद्रातून पाठवण्यात आले होते.
महिलेने आपल्या लग्नाच्या पत्रिकांवर दिली PornHub वेबसाइटची URL; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
महिलेच्या डोक्याला दुखापत झाली असून तिच्यावर स्थानिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले, त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. मुरैना येथील मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी (सीएचएमओ), राकेश मिश्रा म्हणाले, “आरोग्य केंद्रात महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी कथितरित्या वॉर्ड बॉयला कापसावर कार्डबोर्डसारखे काही साहित्य ठेवण्यास सांगितले होते, परंतु त्याने त्याऐवजी कंडोमचे पॅकेट ठेवले.” पुढे मिश्रा म्हणाले की, वॉर्ड बॉयला तत्काळ सेवेतून काढून टाकण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
IND vs ZIM: झिम्बाब्वेमधील महिला फॅनला पडली दीपक चहरची भुरळ; सामन्यादरम्यानच केली ‘ही’ विचित्र मागणी
या घटनेनंतर आता पोरसा सामुदायिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि ड्रेसर्सच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुरैना येथील आंबा-पोरसा, सबलगड-कैलारस आणि जौरा या सामुदायिक आरोग्य केंद्रांना आरोग्य विभागाकडून दरमहा लाखो रुपयांचे बजेट पाठवले जाते. असे असतानाही कापसाऐवजी कंडोमचे रिकामे पाकीट पट्टी बांधले जात असल्याची स्थिती आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे.