Viral video: प्रेम अंधळं असतं असं म्हंटलं जातं मात्र आजूबाजूची लोकं आंधळी नसतात. प्रेमासमोर जगाची पर्वा केली जात नाही असे म्हटले जाते. मात्र आजची पिढी या गोष्टीचे जास्तीच अनुकरण करत असल्याचे दिसून येत आहे. प्रेमात पडल्यावर वेळ-काळ नाही बघावा असेही म्हटले जाते मात्र ते व्यक्त करताना आजूबाजूच्या परिस्थीची जाण ठेवणे फार गरजेचे असते. आजकाल प्रेमाच्या व्याख्या फार बदलल्या आहेत. पूर्वीप्रमाणे तरुण आजकाल आपले प्रेम व्यक्त करताना घाबरत नाहीत, रोखठोकपणे ते आपली मतं मांडतात मात्र बऱ्याचदा नको त्या ठिकाणी आपल्या प्रेमाचं प्रदर्शन करू लागतात, यामुळे इतर लोकांना याचा त्रास होत असतो.

आपण प्रेमात आपल्या मर्यादा लक्षात घेऊन गोष्टी करायला हव्यात, भान हरपून कुठेही आपले प्रेम व्यक्त करू नये. आजकाल तरुण-तरुणी सार्वजनिक ठिकाणी आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. सोशल मीडियावर येत्या काळात असे अनेक व्हिडिओज व्हायरल झालेत. सध्या यात आणखीन एका व्हिडिओची भर पडली आहे. सोशल मीडियावर नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कपल रेल्वे स्टेशनवरच झोपले आहेत आणि अश्लील चाळे करत आहेत. त्याच्या या लज्जास्पद कृतीचा व्हिडिओ जवळील एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला असून हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे कपल थेट रेल्वे स्टेशनवर चादर घेऊन झोपले आहेत. यावेळी त्यांचे अश्लिल चाळे सुरु असलेले दिसत आहेत.गजबजलेल्या भर गर्दीतच या तरुण-तरुणीचे अश्लिल चाळे सुरु होते. कशाचीच पर्वा न करता हे कपल बेभान झाल्याचं दिसत आहे. प्रवाशांनाही या दोघांना बघून धक्का बसला आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Pyare Raja (@pyare.raja.904)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ pyare.raja.904 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत.लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. एकानं म्हंटलंय की, “अशा लोकांवार कारवाई केली पाहिजे तेव्हाच हे सुधारतील” तर आणखी एकानं, हे असे प्रकार हल्ली वाढले आहेत, सार्वजनिक ठिकाणी लोक आता भान ठेवत नाहीत अशी प्रतिक्रिया दिली आहे.