Viral Video: समाजमाध्यमांवर नेहमी विविध व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात, ज्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात; तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मगर अचानक हरणांच्या कळपावर हल्ला करताना दिसत आहे, जे पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.
जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप सावध राहावे लागते. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हरीण आणि मगरीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एका तहानलेल्या हरणांच्या कळपावर मगर हल्ला करण्यासाठी आल्याचे दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, हरणांचा एक कळप पाणी पिण्यासाठी जंगलातील खाडीजवळ जातो. यावेळी ती हरणे मनसोक्त पाणी पिण्यात मश्गूल असतात. तेव्हा खाडीच्या शेवाळाखाली मगर हरणांच्या कळपावर हल्ला करण्याच्या दृष्टीने दबा धरून बसलेली असते. संधी साधून, ती मगर अचानक वर येते. मग मगरीला पाहून हरणांच्या कळपाचा थरकाप होतो आणि ती हरणे जीव वाचवण्यासाठी तिथून पळतात. मात्र, त्यातील एक हरण मगरीच्या तावडीत सापडते. ती हरणाला आपल्या कराल जबड्यात पकडून खाडीमध्ये ओढत घेऊन जाते.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ युट्यूबवरील @BBC Earth या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत सहा दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि २५ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप भयानक! मी कल्पनाही करू शकत नाही.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “बीबीसीद्वारे अतिशय सुंदर छायाचित्रण.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ पाहून धक्का बसला.” चौथ्या युजरने लिहिलेय, “मला खूप वाईट वाटलं हे पाहून.”