Viral Video Daughters Plan Surprise For Father : दिवसभर काम करून थकवा येतो. त्यामुळे घरी जाऊन, फ्रेश होऊन, जेवून, कधी बेडवर अंग टाकतोय, असं आपल्याला झालेलं असतं. त्यातच घरी गेल्यावर घरात शांत वातावरणात गप्पा मारणारं, सगळं टेन्शन विसरून हसत-खेळत घरी स्वागत करणारं कुटुंब असावं, असं आपल्याला सगळ्यांनाच कुठेतरी वाटत असतं. त्यामुळे चांगली नोकरी किंवा पैसा नाही, तर सोन्यासारखी माणसं घरात असली की, घराच्या कर्त्यासवरत्या पुरुषाला कुटुंबासाठी तो करीत असलेल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं समाधान मिळतं. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
कामावरून थकून येणाऱ्या बाबांचे खास स्वागत करण्यासाठी आई आणि लेकींनी जबरदस्त तयारी केल्याचे दिसते आहे. बाबा जसे दरवाजात येतात, तशी लगेचच आई ‘दिल बहलता है मेरा, आपके आ जाने से’ हे गाणं लावते. फक्त गाणंच लावत नाही, तर त्या गाण्यावर दोन्ही मुली चक्क बाबांकडे बघून डान्स करण्यास सुरुवात करतात. लेकींनी केलेलं खास स्वागत पाहून बाबादेखील भारावून जातात आणि खांद्यावरची बॅग काढून लगेचच त्यांच्याबरोबर डान्स करण्यास सुरुवात करतात.
लेकींनी केलं बाबांचे हटके स्वागत (Viral Video)
वडील आणि मुलगी यांचे नाते म्हणजे शब्दांत मांडता न येणारी एक कविता. आईसाठी तिचा लाडका लेक आणि बाबासाठी त्याची लेक ही अत्यंत जवळची असते. त्यामुळे लेकीनं मनापासून केलेली एखादी गोष्ट त्यांना अगदी मनापासून आवडते. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, दिवसभर नोकरी करून, प्रवासात थकून येऊन लेकींनी केलेल्या हटक्या स्वागतामुळे बाबांच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं आणि त्यांचा दिवसभराचा थकवा अगदी क्षणात नाहीसा झाला. एकदा बघाच हा व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @worldcinemalife या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये ‘मुली त्यांच्या वडिलांचे डान्सने स्वागत करतात आणि बाबासुद्धा लगेचच त्यात सामील होतात’ असे म्हटले आहे. नेटकरी तर हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “असे बाबा सगळ्यांना मिळू देत”, “व्हिडीओ बघून मला माझ्या बाबांची आठवण आली”, “ना पैसा, ना नोकरी; ही एकच गोष्ट पुरुषाला बनवते श्रीमंत”, “व्हिडीओ बघून चेहऱ्यावर हसू आले”, “‘हे सुख पैशानं विकत घेता नाही येत” आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.