Solapur flood: सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून महापुराची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली बुडाले आहेत, रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत, घरे आणि दुकानाचे पाण्यामुळे नुकसान झाल आहेत, तर काही भागांमध्ये लोकांना अन्न आणि पिण्याच्या पाण्याची देखील मिळत नाही आहे. पावसामुळे नागरिकांची दैनंदिन जीवनशैली पूर्णपणे अडथळ्यांत अडकली आहे; विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊ शकत नाहीत, तर वयोवृद्ध आणि आजारी लोक अधिक धोक्यात आहेत. या महापुरामुळे जनजीवनावर होणारा परिणाम इतका भयंकर आहे की शहरभरात भीती, चिंता आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. या गंभीर परिस्थितीतही एक छोटा, पण हृदयस्पर्शी प्रसंग घडला, महापुराच्या परिस्थितीत एक वेगळा प्रसंग घडला, ज्याने स्थानिक लोकांचे हृदय जिंकले.
मध्य सोलापूरच्या भागात पाण्यात अडकलेल्या एका कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे कुत्रा स्वतःला सुरक्षित बाहेर काढू शकत नव्हता. परिसरातील नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी धाडस दाखवले. त्यांनी एकत्र येऊन कुत्र्याला पाण्यातून बाहेर काढले आणि सुरक्षित स्थळी नेले.
पाहा व्हिडिओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर होताच लोकांनी धाडस करणाऱ्या नागरिकांचे कौतुक केले. एकाने तर म्हटले ,“या मुक्या जीवाला जीवनदान देणाऱ्या दादांना अभिवादन, हीच खरी माणुसकी.” या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर नागरिक भारावून गेले आहेत. अनेकांनी तरुणांच्या धाडसाला सलाम केला. प्राण्यांप्रती असलेली ही संवेदनशीलता पाहून अनेकांचे डोळे भरून आले.
मात्र, या पूरस्थितीवर काही प्रश्नचिन्हेही उपस्थित झाली आहेत. काहींनी लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली, तर काहींनी राज्यसेवा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या अडचणींवर चिंता व्यक्त केली. महापुरामुळे सगळीकडे अंधार, भीती आणि दु:खाचं वातावरण पसरलं आहे. पण, त्या परिस्थितीत या कुत्र्याचा जीव वाचवणाऱ्या लोकांनी दाखवलेली माणुसकी म्हणजेच आशेचा आणि दयेचा उजेड आहे.
आज या घटनेमुळे एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली – संकट कितीही मोठं असलं तरी दया, करुणा आणि माणुसकीची भावना जिवंत असेल तर जीव वाचवणे शक्य होते. सोलापूर–सांगलीतील पुरामुळे हादरलेल्या जनजीवनात या घटनेने आशेचे नवे किरण दाखवले आहे.