Elderly Person Carrying Heavy Garbage Viral Video : आपण राहतो, जिथे वावरतो तेथील परिसर स्वच्छ ठेवणे ही आपलीच जबाबदारी असते. पण, काही जण सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर भान विसरून जातात आणि इथे-तिथे कचरा फेकतात. हा कचरा कोणाला उचलावा लागत असेल, ही घाण उचलताना त्यांना किती विचित्र वाटत असेल याबद्दल आपण कोणीच विचार करत नाही. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये एक वृद्ध व्यक्ती डोक्यावर कचऱ्याचा भार घेऊन शिड्या उतरताना दिसते आहे.

गडावर चढताना कधी-कधी तरुण मंडळींचे किती हाल होतात. तिथे एक व्यक्ती डोक्यावर भलीमोठी गोणी घेऊन खाली उतरताना दिसत आहेत. व्हिडीओ कोणत्या गडाचा आहे याबद्दल अद्याप कळू शकलेलं नाही. पण, या गोणीचा आकार त्या वृद्ध व्यक्तीच्या शरीरापेक्षा मोठा आणि भार एका दगडापेक्षा कमी नाही असे या व्हिडीओतून दिसते आहे. गडावर फेकला जाणारा संपूर्ण कचरा या गोणीत भरून वृद्ध व्यक्ती गडाच्या पायऱ्यांवरून घेऊन येते आहे; जे खूपच लाजिरवाणे आहे.

तो कचरा साफ करताना किती त्रास होतो याचा विचार करा (Viral Video)

फक्त गड किल्लेच नाही तर इतरही सार्वजनिक ठिकाणी आपण खाण्या-पिण्याची सोय व्हावी म्हणून अनेक गोष्टी बॅगेतून घेऊन जातो. पण, त्यातील मोजके जण कचरा पुन्हा आपल्या बॅगेत टाकून घरी घेऊन येतात. तर बरीच मंडळी कचरा बसलेल्याच जागी फेकून पुन्हा घरी येतात. त्यामुळे तो कचरा उचलण्याचे काम सफाई कामगार व इतर काही लोकांना करावे लागते आणि तो कचरा व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे गोळा करून गडावरून खाली घेऊन यावा लागतो. एकदा बघाच हा व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “कोणत्याही किल्ल्यावर कचरा टाकण्यापूर्वी तो कचरा साफ करताना किती त्रास होतो याचा विचार करा. जे लोक गड किल्ल्यावर पाण्याची बाटली किंवा अन्य काही प्लास्टिक वस्तू घेऊन जात असाल तर ती कृपया परत खाली घेऊन या ही नम्र विनंती” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच नेटकरी हा व्हिडीओ पाहून “ढकलत न्यायला पाहिजे २-३ जणांनी… मान दुकायचं काम आहे”, “Civic sense नसेल तर गड किल्ल्यांवर पाय ठेऊ नका. अक्कल शून्य मूर्ख लोकं”, “नालायक लोकांना अक्कल पाहिजे महाराजांनी जे गड किल्ले जिंकले तिथेच घाण करतात लाज वाटली पाहिजे”, “जस तुम्ही बॅग घेऊन जाता ना तसंच तुमचा कचरा तूम्ही बॅग मधे घेऊन गेला तर किती चांगल होईल” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.