Rescued Elephant Shows Gratitude Viral Video : भावनिक, हुशार, प्रेमळ, तर कधी रागीट अशा अनेक गुणांनी ओळखला जाणारा जगातील सर्वांत प्रिय असलेल्या प्राण्यांपैकी एक म्हणजे हत्ती. हत्तीची अनेक रूपे तुम्ही आजवर पाहिली असतील. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये हत्तीण तिला मदत करणाऱ्यांना आशीर्वाद देताना दिसली आहे. तर नक्की हत्तीण कोणत्या संकटात सापडली होती? तिने मदत करणाऱ्यांना आशीर्वाद का दिला याचे याचे उत्तर आपण बातमीतून जाणून घेऊयात…
पर्यटकांचा जंगलातील प्राण्यांसोबत कशा प्रकारे सामना होतो, संकटात अडकल्यावर त्यांचा जीव कोण कशा प्रकारे वाचवला जातो, अशा स्वरूपाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. काल शनिवारी (५ जुलै) हत्तीण तिच्या कळपासह माहुरा या राखीव जंगलातून जात असताना एका खड्ड्यात पडली. प्राणी पडल्याच्या आवाजाने स्थानिक सावध झाले आणि वनाधिकाऱ्यांना तत्काळ परिस्थितीची माहिती देण्यात आली. घटनास्थळी एक बचाव पथक आणि एक उत्खनन यंत्र (जेसीबी) पाठविण्यात आले.
ती सैनिकांना आशीर्वाद देत होती (Viral Video)
बचावकर्त्यांनी हत्तिणीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर केला. जेसीबीचा वापर करून हत्तिणीला मागून ढकलून, सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. हत्तीण बाहेर आली आणि काही क्षण जेसीबी व बचावकर्त्यांकडे एकटक बघतच राहिली आणि नंतर ती तिच्या कळपात सामील झाली. माजी आयएफएस अधिकाऱ्याने या क्षणाची कल्पना अनोख्या रूपात केली. आपला जीव वाचल्यामुळे जेसीबी आणि बचावकर्त्यांना हत्तीण जणू आशीर्वाद देते आहे, असेच काहीसे त्यांना जाणवले.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांच्या @susantananda3 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘काल रात्री (५ जुलै) एक हत्तीण खड्ड्यात पडली. राउरकेला टीमने जेसीबीच्या साह्याने रस्ता बनवला आणि थोड्याशा धक्क्याद्वारे हत्तिणीला खड्यातून बाहेर काढण्यात आले. जंगलात परतताना, ती सैनिकांना आशीर्वाद देत होती. राउरकेला टीमला सलाम’, अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे.