Post Diwali Air Pollution Fact Check : पंजाबममध्ये शेतातील पेंढा (परळी) जाळण्याच्या घटनांमध्ये ७७.५ टक्के घट झाली असूनही (ज्याला दिल्लीतील हिवाळ्यातील वायू प्रदूषणाचे एक प्रमुख कारण मानले जाते होते) राजधानी दिल्लीत मंगळवारी सकाळी गेल्या पाच वर्षांतील दिवाळीनंतरची सर्वात वाईट हवेची गुणवत्ता नोंदवली गेली आहे. यादरम्यान लाईटहाऊस जर्नलिझम’ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत असल्याचे आढळले. या व्हिडीओमध्ये पंजाबममध्ये शेतातील पेंढा जाळताना दाखवण्यात आले होते. व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजर्सनी दावा केला की, हा व्हिडीओ अलीकडचा आहे, ज्यामुळे नवी दिल्लीत प्रदूषण झाले.
पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की हा व्हिडीओ गेल्या वर्षीचा आहे, अलीकडचा नाही.
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर्स @vsvadivelfca ‘VSV Diaries’ ने हा व्हायरल व्हिडीओ “पंजाबमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात शेतातील पेंढा (परळी) जाळला जात आहे, त्यामुळे दिल्ली आणि तिच्या आजूबाजूच्या परिसरातील हवेच्या प्रदूषणाचे हे एक मुख्य कारण ठरते आहे,” या दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला जातो आहे.
इतर युजर्सही हाच व्हिडीओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर करताना दिसत आहेत.
https://twitter.com/Princek28555227/status/1980996614056739294
तपास:
आम्ही एक्सवरील पोस्ट्मध्ये एम्बेड केलेली एएनआय (ANI) पोस्ट पाहून आमचा तपास सुरू केला.
यामुळे आम्हाला १ नोव्हेंबर २०२४ ची एएनआय पोस्ट मिळाली.
कॅप्शनमध्ये लिहिले होते – #WATCH | पंजाब: मोगा जिल्ह्यातील डाग्रू गावात एका शेतात परळी जाळल्याची घटना दिसली.
आम्हाला बातम्यांचे अहवालदेखील मिळाले ज्यात म्हटले होते की, ‘या वर्षी पंजाबमध्ये परळी जाळण्याच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे, १५ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबरदरम्यान याचा आकडा ४१५ होता, तर गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा कमी होऊन १,५१० इथपर्यंत नोंदवण्यात आला, त्यामुळे संख्या बघता ही मोठी घट आहे.
https://www.newsbytesapp.com/news/india/punjab-sees-70-drop-in-stubble-burning/story
निष्कर्ष : नवी दिल्लीतील वायू प्रदूषण पंजाबमधील शेतातील पेंढा जाळल्यामुळे झाले असल्याचे सांगून एक जुना व्हिडीओ शेअर केला जात आहे. पण, तपासानुसार व्हायरल होत असलेला दावा दिशाभूल करणारा आहे.
