Viral Video Family Celebrate Grandmother 88th Birthday : घरात मोठी माणसे असणे भरपूर महत्वाचे असते. मग ते आजी-आजोबा असो, भाऊ-बहीण असो किंवा घरातील काकी-काका. कारण- या सगळ्यांचा आयुष्य जगण्याचा अनुभव आपल्यापेक्षा थोडा जास्तच असतो. एखादा सण कसा साजरा करायचा, करिअर करण्यासाठी कोणते क्षेत्र निवडायचे किंवा अगदी पैशांची गुंतवणूक कुठे व कशी करायची याबद्दल अचूक प्रशिक्षक देऊ शकतात. त्यामुळेच या सगळ्यांची लहानातल्या लहान क्षणाला उपस्थिती अनेकदा एका मोठ्या सणासारखी वाटते.

श्रुती सरफरे या @shruti_sarfare इन्स्टाग्राम युजरने शेअर केलेल्या व्हिडीओनुसार घरातील सगळ्यांच्या लाडक्या आजीचा ८८ वा वाढदिवस साजरा केला जातो आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी अगदी घराच्या बाहेर असलेल्या अंगणापासून ते घरात सोफ्यावर बसलेल्या आजीपर्यंत कुटुंबातील सदस्यांनी रांग लावलेली दिसते आहे. ही रांग आजीला शुभेच्छा देण्यासाठी किंवा भेटवस्तू देण्यासाठी नव्हे तर आजीला मानाचा मुजरा देण्यासाठी आहे. त्यामुळे हा वाढदिवस आणखीन खास ठरतो आहे.

घराची शोभा ही जुनी माणसे (Viral Video)

घर किती मोठे आहे त्यापेक्षा तेथील राहाणा-या माणसांची मने किती मोठी आहेत त्याला अधिक मोल असते. घर किती सजवले, रंगवले आहे त्यापेक्षा तिथे राहणाऱ्या लोकांचे मन किती चांगले आहे हेच पहिले जाते. आजीचा वाढिवस साजरा करण्यासाठी कुटुंबातील ही सोन्यासारखी मंडळी जमली आहेत. आजीने मॅक्सी घातली असली तरीही तिच्या प्रजेने मुजरा करत, डोक्यावर छत्री धरून, तिच्या वयाच्या आकड्याचा फुगा धरून आणि हॅप्पी बर्थडेचा सॅश घेऊन आजीचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @shruti_sarfare या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “आमच्या घरची महिष्मती” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “मोठी माणस घरात असल्याशिवाय घराला “घरपण” येत नाही”, “एक तरी ज्येष्ठ हवे घरात.. घराची शोभा ही जुनी माणसे”, “आईआजीचा १००वा वाढदिवस… साजरा होणार”, “खूप छान शोभत आहे महिष्मती…”, “वटवृक्ष” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.