Viral Video: सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक गोंडस व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरुन हसायला येते तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एका चिमुकलीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ही चिमुकली खुप सुंदर डान्स करताना दिसत आहे.
हल्ली कधी कुठलं गाणं मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल, हे सांगता येत नाही. या चर्चेत असलेल्या गाण्यांवर प्रत्येक वयोगटातील लोक, मोठमोठे कलाकारही ठेका धरताना दिसतात. अनेकदा सोशल मीडियावर जुनी गाणीही खूप चर्चेत येतात. आता अशाच एका हिंदी जुन्या गाण्यावरील डान्स खूप व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक चिमुकली “सोजा जरा” गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की डान्स करताना ती सुंदर हावभाव सुद्धा करत आहे. तिचे चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. इतक्या कमी वयात इतके सुंदर हावभाव करणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @zakasss_memer या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत लाखो लाइक्स आणि व्ह्यूज मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “किती गोड राधा आहे” आणखी एकाने लिहिलेय, “किती सुंदर राधा” आणखी एकाने लिहिलेय, “खूपच छान डान्स केला पोरीने”