Viral Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात गाण्याच्या, डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी सोशल मीडियावर गाताना, थिरकताना दिसतात. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात चिमुकलीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी लिहिलेलं एक प्रसिद्ध गाणं गायलं. यामुळे सगळ्यांनीच तिच्या गाण्याचं कौतुक केलं आहे.

व्हायरल व्हिडीओ (Dr. Babasaheb ambedkar Song Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हीही चिमुकलीचं कौतुक कराल. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका शाळेच्या अंगणात काही लहान मुलं बसली आहेत. त्यातलीच एक चिमुकली तिच्या गोड गळ्याने सर्वांसमोर गाणं गाताना दिसत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं ”भीमानं माय सोन्यानं भरली ओटी” या गाण्यावर ही चिमुकली गायली आहे. अगदी लहान असली तरी तिला हे गाणं खूप नीट पाठ असल्याचं दिसून येतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @meerakadam16 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ३.६ मिलियन व्ह्युज आले आहेत. तसंच “हे भारताचं भविष्य आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं धाडस घेऊन जगणारी ही पिढी आहे..!” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “किती गोड बाळा” तर दुसऱ्याने “या वयात मुलीने गाणं गायलं, मोठेपणी ती खूप छान होईल” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “खूप छान किती गोड आवाज आहे”