Viral video: सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळे व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे अगदी मजेशीर असतात. तर अनेकदा असे व्हिडीओ असतात जे पाहून समोरचा तो व्हिडीओ सारखा सारखा पाहतो. सोशल मीडियामुळे देशातल्या कानाकोपऱ्यात असलेलं टॅलेंट जगाच्या समोर येत आहे. आपली आवड जोपासत अनेक जण दर दिवशी असंख्य व्हिडिओ शेअर करत असतात. त्यातले काही निवडक व्हिडिओ नेटिझन्सच्या पसंतीला उतरतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सोशल मीडियावर शाळेचे सुद्धा अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकलीची अनोखी कला दिसून येईल. ज्यात तिने अतिशय सुरेख आवाजात गाणं गायलं आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील मुलीनं ज्याप्रकारे गाणं गायलंय ते ऐकून तिचे सरवच अवाक् झाले आहेत. हा व्हिडीओ पाहाताना चुमच्याही अंगावर शहारे येतील इतकं सुंदर तिनं गायलं आहे.

अंबाबाई लाड लाड ये गं, का गं धरीलास राग कशापाई. हे मराठी गाणं या तरुणीनं गायलं आहे. हे गाणं ऐकताना तुम्हीही हरवून जालं. ग्रामीण भागात जिथे बऱ्याच ठिकाणी भौतिक साधन सुविधा नाहीत, अशा ठिकाणी असा हिरा सापडणं आणि त्याची पारख होणं अवघड आहे. परंतू एका तरुणीमधलं हे अप्रतिम टॅलेंट ओळखलं. सोशल मीडियावरदेखील या व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. ज्याने अख्ख्या महाराष्ट्राल वेड लावलं आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @tadkanewsmarathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बलमिलियन व्ह्युज आले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “किती गोड बाळा” तर दुसऱ्याने “या वयात मुलीने गाणं गायलं, मोठेपणी ती खूप छान होईल” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “खूप छान किती गोड आवाज आहे”