Viral Video: निसर्गाने प्रत्येकाला आपली अशी खास ओळख देऊन तयार केलं आहे. त्यात भारतात तर टॅलेंटला अजिबातच कसर ठेवलेली नाही. प्रत्येक गल्लीबोळात जागतिक दर्जाचं क्रिकेट खेळणारे खेळाडू, डान्सर्स, गायक आणि अनेक प्रतिभाशाली लोक दिसून येतात. काहींच्या टॅलेंटची दखल घेतली जाते तर दुर्दैवाने काहींना नेहमीच पडद्यामागे राहून काम करावे लागते. पण अलीकडे सोशल मीडियाने या सगळ्या पडद्यामागच्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिलं आहे. अलीकडेच एका सायकल गर्लचा व्हिडीओ सुद्धा तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये पारंपरिक पोशाख परिधान करून सायकल चालवणारी तरुणी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. “दिल है तुम्हारा” या चित्रपटातील “दिल लगा लिया” या लोकप्रिय गाण्याला लिप सिंक करत या तरुणीने व्हिडीओ बनवला आहे. अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेले हे गाणे चित्रपटाचे प्रदर्शन होताच बरेच गाजले होते.
या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे या महिलेचं सहजपण! ज्या आरामात व आत्मविश्वासाने ती गाण्यावर लिप सिंक करत आहे. तिने सायकलचे हॅण्डलही धरलेले नाही आणि अत्यंत सुंदर हावभाव करून ती नाचताना दिसत आहे. “मै तुमसे प्यार करके” या कॅप्शनसह @iamsecretgirl023 या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
Video: लेहेंगा घालून सायकलवर तरुणीचा भन्नाट डान्स
हे ही वाचा<< Video: भर लग्नात नवऱ्याच्या मित्रांच्या हटके घोषणांनी नवरी झाली लाल, म्हणाले “दिव्या भाभी हम..”
हा व्हिडीओ बघून लगेच तुम्ही असे प्रताप करायला जाऊ नका. कारण या तरुणीने कितीही आरामात हा डान्स केला असेल तरी बहुधा त्यामागे तिची अपार मेहनत व सराव सुद्धा असणार आहे. या तरुणीची सहजता, सौंदर्य व टॅलेंट तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा.