Viral Video: आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो, त्या व्यक्तीने आपल्याबरोबर नेहमी आपल्या सुख-दुःखात राहावं, आपली सगळी स्वप्नं पूर्ण करावी, आपली काळजी घ्यावी असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. या सर्व इच्छा पूर्ण करणारा जोडीदार अनेक मुलींच्या नशिबात असतो. पण, कधी कधी नात्यात काही कारणामुळे दुरावा निर्माण होतो, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं सुरू होतात आणि हळूहळू हेच भांडण हाणामारीपर्यंत पोहोचते. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर अनेक पती-पत्नी किंवा प्रियकर, प्रेयसीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी त्यांच्या नात्यातील गोडवा दिसून येतो, तर कधी त्यांच्या नात्यातील प्रेम दिसून येते. अनेकदा पती-पत्नीचे भांडतानाचे व्हिडीओसुद्धा व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भररस्त्यात प्रेयसी प्रियकराबरोबर भांडताना दिसत आहे. यावेळी ती त्याच्यावर हात उचलताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक प्रियकर आणि प्रेयसी भररस्त्यात कोणत्या तरी कारणावर बोलत उभे असल्याचे दिसत आहे. यावेळी प्रेयसी प्रियकाराला रागाने काहीतरी बोलत आहे. त्यानंतर अचानक ती त्याच्यावर हात उचलते. तिने हात उचलल्याचे पाहून प्रियकर घाबरतो आणि स्वतःचा कान पकडून तिला सॉरी म्हणून तिच्या पाया पडतो. फार गंभीर नसले तरी अनेक जण हा व्हिडीओ पाहून भररस्त्यात हात उचलणाऱ्या प्रेयसीवर संताप व्यक्त करत आहेत, तर काही जण त्यांच्या नात्यातील हा गोड क्षण असल्याचे म्हणत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @cute_c.ouples या अकाउंंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत दोन लाख व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “खूप क्यूट आहेत दोघे”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “भररस्त्यात असा बालिशपणा करणं चुकीचं आहे”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “लग्नाआधी बायकोच्या मुठीत.”