Viral Video Men Rescue Girl Choking on Chewing Gum : तुम्ही अनेकदा असे लोक पाहिले असतील जे दिवसभर च्युइंगम चघळत असतात. अनेक जण काम करताना, व्यायाम करताना, तर सायकल किंवा अगदी असंच चालायला जाताना सुद्धा च्युइंगम चघळत असतात. तर आज याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये चक्क एका ८ वर्षाच्या चिमुकलीला च्युइंगम चघळणे महागात पडले असते.
केरळमधील कन्नूरमधील पल्लीक्कारा येथे सायकलवरून एक ८ वर्षांची चिमुकली सायकलवरून फिरत असते. तर दुसरीकडे तीन पुरुष एकमेकांशी गप्पा मारताना व्हिडीओत दिसत आहेत. यादरम्यान अचानक, मुलीला तिच्या घशात अस्वस्थता जाणवू लागली. ती सायकल चालवताना च्युइंग गम खात होती. नंतर ते च्युइंग तिच्या घशात अडकले आणि श्वास घेणे कठीण होऊ लागले. मग वेळीच तिने गप्पा मारणाऱ्या त्या अज्ञात पुरुषांकडे सायकल फिरवली आणि त्यांच्याकडे मदत मागितली.
सायकल घेऊन अज्ञात पुरुषांकडे गेली धावत… (Viral Video)
देशात कोणत्याच वयोगटातील महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी महिलांना एकट्यानं घराबाहेर पडणं असुरक्षित वाटतं, मदत मागायला भीती वाटते. पण, आजचा हा व्हिडीओ पाहून कदाचित तुमचे मन बदलून जाईल. घशात च्युइंग अडकल्याचे कळताच तिने अज्ञात पुरुषांच्या ग्रुपकडे धाव घेतली. त्यांनीही एकही क्षणाचा विलंब न करता ग्रुपमधील एकाने तिला सायकलवरून उतरवले. तिच्या पाठीवर मारून च्युइंग काढण्याच्या प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी सुद्धा ठरला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @path2shah या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये सविस्तर घटना लिहिण्यात आली आहे. तसेच नेटकरी व्हिडीओ पाहून “सुंदर! यावरून असे दिसून येते की, बहुतेक लोक मनापासून वाईट नसतात; ते धर्म किंवा जातीची पर्वा न करता मदत करण्यास तयार असतात. आपल्या राजकारणाने आणि धार्मिक नेत्यांनी लादलेल्या टोकाच्या भूमिका लोकांना चुकीच्या दिशेने ढकलतात”, “किती हृदयस्पर्शी व्हिडीओ. ती लहान मुलगी अस्वस्थ दिसत होती. पण, पुरुषांनी वेळीच मदत केली. छान काम मित्रांनो” ; आदी अनेक कमेंट्स केलेल्या दिसत आहेत.