viral video helicopter crash : अचानक घडणाऱ्या घटनांमुळे लोक नेहमीच घाबरतात. कधी कधी ते ज्या ठिकाणी मौजमजेसाठी येतात, ते ठिकाणही धक्कादायक घटनांचे साक्षीदार बनते. अशाच एका अपघाताने हंटिंग्टन बीचवरील पर्यटक आणि स्थानिकांना धक्का बसला. काही सेकंदांत घडलेले हे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चर्चेचा विषय बनले.
कॅलिफोर्नियाच्या हंटिंग्टन बीचवर शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी घडलेल्या धक्कादायक अपघातात पाच जण जखमी झाले. सागरी किनाऱ्यावर आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी हा दिवस नेहमीसारखा नव्हता. डिजिटल युगात हे दृश्य काही सेकंदांत इंटरनेटवर व्हायरल झाले. अपघाताचा थोडक्यात तपशील पाहता, हेलिकॉप्टर अचानक नियंत्रण गमावून पादचारी पुलावर कोसळले, ज्यामुळे काही लोक आणि हेलिकॉप्टरमध्ये बसलेले प्रवासी जखमी झाले.
पाहा व्हिडिओ
व्हिडीओमध्ये दिसतेय की, हेलिकॉप्टर हळूहळू खाली येत आहे. त्याच वेळी, लोक घाबरून ओरडत आहेत आणि काही जण “ohh may god!” असे ओरडताना दिसत आहेत. हेलिकॉप्टर कोसळण्याच्या आधी त्याचा काही भाग फुटल्याचेही दिसते. अपघातानंतर हेलिकॉप्टरमधील दोन प्रवासी आणि रस्त्यावरील तीन जण जखमी झाले. या जखमींमध्ये एक लहान मूलही आहे आणि सर्व जखमींना त्वरित हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
कमेंट्समध्ये लोकांनी या धक्कादायक घटनेवर आपले विचार व्यक्त केले आहेत. काहींनी हेलिकॉप्टर अचानक खाली पडल्याने आणि अपघात टळला नसल्याबद्दल भीती व्यक्त केली आहे. काहींनी जखमींच्या सुरक्षिततेची विनंती केली आहे; तर काहींनी हेलिकॉप्टरमधील आणि रस्त्यावर जखमी झालेल्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हंटिंग्टन बीच पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे, अपघातानंतर हेलिकॉप्टरमधील दोघेांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. रस्त्यावर असलेले तीन जणही जखमी झाले असून, त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खूप गोंधळ उडाला आहे, पर्यटक आणि स्थानिक लोक खूप घाबरल्याचे दिसत आहेत.
हेलिकॉप्टर अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात असून, त्यामुळे लोकांमध्ये धक्कादायक चर्चा सुरू आहे. अपघाताचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही आणि पोलिसांचा याबाबतचा तपास अजूनही सुरू आहे.