Viral Video IAS Officer Royal Farewell By Staff : सेवानिवृत सहकारी किंवा अधिकारी किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामातील सहकार्य आणि योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात येते. या निरोप समारंभात शाल-श्रीफळ, भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल…
मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील आयएएस अधिकारी संस्कृती जैन यांना खूप अनोखा निरोप देण्यात आला आहे. आयएएस अधिकारी संस्कृती जैन यांची भोपाळ येथे नियुक्ती होणार असते; यादरम्यान त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांना सोनेरी पालखीत बसवून नेले. तुम्ही पाहू शकता की, संस्कृती जैन त्यांच्या दोन लहान मुलींसह, एका सोन्याच्या पालखीत बसल्या आहेत. यादरम्यान ढोल-ताश्यांच्या गजरात त्यांना अगदी खास निरोप देण्यात आला आहे.
सिवनी जिल्हाधिकारी म्हणून १५ महिन्यांच्या कार्यकाळात, संस्कृती जैन यांनी अनेक प्रभावी उपक्रम सुरू केले. त्यांनी ‘लाडकी बहीण योजना’ आणि ‘अटल पेन्शन योजना’ एकत्र जोडल्या आणि स्थानिक लोकांच्या प्राथमिक शाळांसाठी बाक आणि टेबल्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यांनी सामान्य लोकांच्या जनकल्याणावर विशेष भर दिला; त्यामुळे त्यांच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले.
व्हिडीओ नक्की बघा…
शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ किंवा आणखीन लक्षात राहणारे गिफ्ट्स देऊन अनेकदा कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ करण्यात येतो. पण, आज तुम्ही व्हायरल व्हिडीओत पाहिले असेल की, कर्मचाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी आयएएस अधिकारी आणि त्यांच्या दोन्ही लेकींना सोनेरी पालखीत बसवले आहे. ही सोनेरी पालखी कर्मचाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी स्वतः खांद्यावर उचलून त्यांना अगदी खास पद्धतीत निरोप दिला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @Abhikhandekar1 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये “मध्य प्रदेशातील आयएएस अधिकारी संस्कृती जैन, ज्या सध्या सिवनीच्या कलेक्टर होत्या, त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांनी निरोप देताना एका वेगळ्या पद्धतीने सन्मान दिला; असा निरोप यापूर्वी कधीच पाहिला गेला नव्हता. अनेक अधिकारी त्यांच्या कामामुळे आणि प्रामाणिकपणामुळे आनंदी झाले आहेत, अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे.