Maharashtra Viral Auto Video : प्रत्येकाला आपलं वाहन प्रिय असतं. रिक्षा, ट्रक आणि इतर वाहनांमध्ये आकर्षक स्टिकर्सचा उपयोग करून काही वाहनमालक स्वत:च्या गाडीची मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून अशी काही देखणी सजावट करतात की, अनेक जण त्याकडे नकळतपणे आकर्षित होतील. पण, तुम्ही तुमच्या वाहनांवर किती खर्च करू शकाल याचा काही अंदाज लावू शकता का? तर आज अशाच एका रिक्षाचालकाची चर्चा होत आहे; ज्याने लाख रुपये खर्च करून त्याची रिक्षा सजवली आहे.

महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये तीन चाकी वाहनाने एका अनोख्या आलिशान प्रवासात रूपांतरित केले आहे; ज्यामुळे प्रवाशांना आराम आणि सुविधा दोन्ही मिळाल्या आहेत. नव्याने तयार केलेल्या या रिक्षामध्ये पॉवर विंडो, एअर कंडिशनिंग आणि कन्व्हर्टिबल सीट्स सारख्या सोयी प्रवाशांसाठी करण्यात आल्या आहेत; याचबरोबर कस्टमाइज्ड रिक्षामध्ये चार दरवाजे सुद्धा आहेत. ज्यामुळे प्रवाशांना प्रीमियम कारशी स्पर्धा करणारा अनुभव प्रवासादरम्यान मिळणार आहे.

आलिशान ऑटो (Viral Video)

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरात ही अनोखी रिक्षा बघायला मिळाली आहे; ज्यामध्ये मागील सीटचे बेडमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे; ज्यामुळे ते लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उत्तम ठरणार आहे. मागे भरपूर बूट स्पेस देखील आहे, ज्यामुळे प्रवाशांना त्यांचे सामान सहजतेने ठेवता येईल. ही रिक्षा पाहून तुम्हाला एखाद्या आलिशान गाडीमध्ये बसल्यासारखं वाटेल. ड्रायव्हरच्या सर्जनशीलता आणि कारागिरीबद्दल दाखवणारा हा व्हिडीओ एकदा नक्की बघाच…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @uff_sam या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “एलोन मस्क, कृपया हे पाहा”, “ऑटोच्या जागेचे आणि सौंदर्याचे कौतुक”, “आलिशान ऑटो”, “ऑटोला लक्झरी राईडमध्ये रूपांतरित करण्यासाठी किती वेळ लागला” आदी कमेंट्स तर अनेक युजर्सनी रिक्षाची तुलना थारसारख्या आलिशान वाहनांशी कमेंटमध्ये केलेली दिसते आहे.