Mama And Bhachi Viral Video : मामा म्हणजे भाच्याचा किंवा भाचीचा हक्काचा माणूस असतो. कारण भाचा आणि भाचीचे लाड पुरवणारी एकमेव व्यक्ती कुटुंबात असते ती म्हणजे मामा. आई-वडील, आजी-आजोबांप्रमाणेच अगदी निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे मामा असतो. दिवाळीत नवीन कपडे आणण्यापासून ते वाढदिवसाला त्याने आपल्यासाठी काय आणले आहे हे पाहण्याची सगळ्यात जास्त उत्सुकता असते. आज सोशल मीडियावर असेच काहीसे दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
लाडक्या भाचीचा वाढदिवस असतो आणि लाडक्या भाचीला काय भेटवस्तू म्हणून हवे असते याबद्दल मामाला आधीपासून कल्पना असते. केक नाही तर वाढदिवसाला स्टडी टेबल भाचीला हवा असतो. मग वाढदिवसाच्या दिवशी भाचीचे डोळे मिटून ठेवलेले असतात. त्यानंतर मामा रूममध्ये स्टडी टेबल घेऊन येतो. त्यानंतर चिमुकली डोळे उघडते आणि स्टडी टेबल पाहून खुश होते. त्यानंतर हळुवारपणे जाऊन ती स्टडी टेबलवर बसते.
मामा असावा तर असा (Viral Video)
लहान मुलांना गिफ्ट भरपूर असतात. त्यामुळे वाढदिवसाला तुम्ही केक आणला नाही तरी चालेल. पण, त्यांच्यासाठी सरप्राईज गिफ्ट नक्कीच आणावे लागते. खेळण्यातील सायकल, कार, पट्टी, पेन्सिल, दप्तर, नवीन बाटली, परीक्षेसाठी पॅड आदी अनेक वस्तू त्यांना तुम्ही त्यांना भेट म्हणून दिल्या की, त्यांचा आनंद गगनात मावत नाही. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओत सुद्धा हवी असणारी गोष्ट मामाने आणून दिली म्हंटल्यावर भाचीच्या चेहऱ्यावर नकळत हसू आले आहे…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @arha_aami__ आणि @a_t_h_u_l__________ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “थँक यू मामा” अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. तसेच नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून खुश झाले आहेत आणि काही जण चिमुकलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत, तर अनेक जण त्यांच्या भावना इमोजीद्वारे व्यक्त करताना दिसत आहेत.