Man Fell From 3rd Floor Viral Video : सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात; ज्यामध्ये कधी मजेशीर, कधी विचित्र, कधी धक्कादायक घटना घडतात. सीसीटीव्ही फुटेज किंवा अगदी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या माणसांनी ती दृश्ये कॅप्चर केलेली असतात; त्यामुळे या घटना खरंच घडल्या आहेत या गोष्टीवर आपला विश्वास लगेच बसतो. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये तिसऱ्या मजल्यावरून एक माणूस पडतो. पण, पुढे जे घडतं ते पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही घटना राजस्थानमधील जोधपूरची आहे. ९ सप्टेंबर रोजी ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी २५ वर्षीय नजीर हा व्यापारी दुकानाच्या बाल्कनीजवळ उभा राहून पाणी पिणार होता. पाणी पिण्याच्या आधीच अचानक त्याचा तोल गेला आणि तो बाल्कनीच्या भिंतीवरून थेट खाली पडला. नझीर पडल्यानंतर मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर व्यापाऱ्याच्या दुकानातून आणखी दोन लोक बाल्कनीकडे धावत आले.

“त्याचं नशीब चांगलं होतं म्हणून” (Viral Video)

फक्त दुकानातीलच नाही तर आजूबाजूच्या परिसरातील अनेक जण तिथे धावून आले आणि नक्की काय घडलं हे बघण्याचा प्रयत्न करू लागले. व्हिडीओच्या कमेंटमध्ये सांगितल्यानुसार खाली पार्क केलेल्या कारमुळे नझीरचा जीव वाचला आणि तो सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे. पण, हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला आणि लोक अशा अपघातांना रोखण्यासाठी चांगली खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहेत. एकदा बघाच सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @Deadlykalesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “सेफ्टी ग्रिलशिवाय एवढी खराब बाल्कनी कोणी बांधली?”, “जर तिथे एखादे लहान मूल असते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती”, “तो वाचला हे एका चमत्कारापेक्षा कमी नाही”, “मला बघूनच भीती वाटली”, “त्याचं नशीब चांगलं होतं म्हणून” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.