सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ गंभीर असतात. असे व्हिडीओ आपल्या कायम लक्षात राहतात.

परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवते असं म्हणतात. पोटाची भूक भागवण्यासाठी अनेक जण काहीही करतात, जरी याचा त्रास झाला तरी त्यांच्याजवळ दुसरा पर्याय नसतो. कुटुंबाच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी घरचा कर्ता स्वत: कष्ट घेऊन हाताला येईल ते काम करतो. मग यात त्याला किती त्रास होईल याचा विचार तो कधीच करत नाही. पण काही जण मुद्दाम त्यांच्या परस्थितीचा गैरफायदा घेतात आणि त्यांना त्रास देतात. तर काहींच्या नकळत त्यांना त्रास आणि अपमानाला सामोरे जावे लागते. पण परिस्थितीमुळे कितीही त्रास झाला तरी ते सहन करतात. सध्या अशीच काहीशी घटना एका ठिकाणी घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, या व्हिडीओत आपल्या मजेच्या नादात एका माणसामुळे एका कलाकाराला त्रास झाला. नेमकं काय घडलं, ते जाणून घेऊ या…

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात दोन माणसं अगदी बेभान होऊन फुगडी घालताना दिसतायत. कार्यक्रमात फुगडी घालत असताना त्यांना आजूबाजूचं भानदेखील नाही आहे. अनेकजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचा उत्साहदेखील वाढवताना दिसत आहेत. पण त्याच कार्यक्रमात ढोल वाजवण्यासाठी आलेल्या कलाकारांकडे मात्र त्यांचं लक्ष नसतं. त्यांच्या मजेच्या नादात फुगडी घालता घालता ते एका ढोलवादकाला धक्का देतात आणि तो माणूस तिथेच खाली कोसळतो.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @maharashtra_remix_reel या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, स्वत:च्या आनंदासाठी कधी कोणाला त्रास देऊ नका अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.५ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्यांना काय माहित गरिबांना काय काय करावं लागतं.” तर दुसऱ्याने “किती वाईट आहे तो माणूस, बिचाऱ्या गरिबाला पाडलं.” तर तिसऱ्याने “कशी माणसं आहेत ही, त्याला उचलायचं सोडून बघत बसली आहेत” अशी कमेंट केली.