प्राण्यांचे अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, त्यातील काही व्हिडीओंमध्ये रानटी प्राण्यांचे रौद्र रूप देखील आपल्याला पाहायला मिळते. तर काही व्हिडीओंमध्ये आपल्या जीवाला धोका असणाऱ्या प्राण्यांसोबतच स्टंट करण्याचा प्रयत्न केला जातो. जो कधीकधी फसतो आणि त्यामुळे काहीजणांना दुखापत होते तर काहींना जीवही गमवावा लागतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक माणूस चक्क मगरीच्या तोंडात हात घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. या माणसाने मानेने मगरीचे तोंड धरल्याचे दिसत आहे, जेणेकरून मगरीला तोंड बंद करता येऊ नये. त्यानंतर मगरीच्या तोंडात हात टाकल्यानंतर काय होते पाहा.

आणखी वाचा: Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: ‘एकमेका साहाय्य करू…’; माकडाची ‘ती’ कृती पाहून नेटकरी झाले अवाक; पाहा Viral Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मगरीच्या तोंडात हात टाकताच मगर पटकन तोंड बंद करते, पण त्याआधीच तो हात बाहेर काढण्यात यशस्वी होतो.अगदी काही सेकंदाच्या फरकाने या माणसाचा हात वाचतो. हा थक्क करणारा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अशा स्टंट्सबाबत चिंता व्यक्त केली आहे. काही लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी असा जीव धोक्यात घालणे चुकीचे असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.