Viral Video Man Saved by JCB Driver : एखाद्याला संकटाच्या काळात मदत केल्यावर मनाला शांती आणि सुख मिळते. पण, संकट काळात एखाद्याला मदत करताना आपण त्याची मदत करण्यासाठी घेतलेला निर्णय सुद्धा योग्य असावा लागतो. नाही तर त्या व्यक्तीसह आपणही संकटात सापडू शकतो. तर आज सोशल मीडियावर सुद्धा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये जेसीबी चालकामुळे एका अज्ञात माणसाचा जीव वाचला आहे.

व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. अज्ञात व्यक्ती कदाचित कामगार असते. एका खड्यात उभं राहून ती जेसीबी चालकाद्वारे काम करून घेत असते. तितक्यात खड्ड्याच्या बाजूला असणाऱ्या जमिनीचा भाग कोसळतो. यादरम्यान त्या अज्ञात कामगारावर भिंत पडणार इतक्यात चालक जीसीबीच्या सहाय्याने पकडून ठेवतो. त्यामुळे अज्ञात व्यक्ती तिथून बाहेर पडतो.

जेसीबी चालक ठरला देवदूत (Viral Video)

माणुसकीपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही असे म्हटले जाते. पण त्यासाठी एक चांगला माणूस बनणं महत्वाचे आहे. तुमच्याकडून मिळालेली थोडीशी मदत एखाद्याचे भाग्य बदलवू शकते. तसेच काहीसे व्हायरल व्हिडीओत बघायला मिळाले आहे. जेसीबी चालकाने वेळीच योग्य निर्णय घेतला. नाही तर कदाचित भिंत कोसळून अज्ञात कामगाराचा जीव सुद्धा गेला असता.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @boltamaharashtra या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “जेसीबी चालकाला मनापासून धन्यवाद… त्या काकांना आज पूर्णजन्म दिला आहे” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “देवदूत”, “काका शेट उपटायला गेला का तिथं”, “कर्म” ; आदी कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.