Viral Video Man Slaps Two Men For Spitting : देशात असे अनेक जण असे आहेत जे त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एखाद्याला कचरा टाकताना, सार्वजनिक ठिकाणी लघवी करताना, रस्त्यावर थुकतांना, गरज नसताना ट्रेनमधील पंख चालू ठेवू नका असा सल्ला देताना दिसतात. तर, पंजाबमध्ये सुद्धा अशीच एका घटना घडली आहे. पण, ही घटना पाहून काही नेटकऱ्यांना संताप आला आहे.

एक अज्ञात व्यक्ती रस्त्यावर दोन पुरुषांना गुटखा खाऊन थुंकताना बघते आणि तिथूनच मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात करते. यादरम्यान अज्ञात व्यक्ती गाडी थांबवतो, बाहेर पडतो आणि दोन्ही गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांना जाब विचारतो. इतकंच नाही तर कॅमेरा त्यांच्याकडे दाखवतो आणि म्हणतो, “हीच ती माणसं आहेत जी रस्त्याच्या कडेला गुटखा खाऊन थुंकतात”. एवढं बोलून तो थांबत नाही तर दोन्ही पुरुषांना कानाखाली मारतो, त्यांना कान धरून कॅमेऱ्यासमोर माफी मागायला लावतो आणि त्यांना उठाबशा करायला भाग पाडतो.

मारणे हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही (Viral Video)

तंबाखू, गुटखा, सिगारेट, पान अशा पदार्थांच्या सेवनामुळे गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. मात्र, या व्यसनांचा इतर नागरिकांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. त्यामुळे गुटखा खाऊन थुंकणे हा गुन्हा आहे. पण, गाडीतून उतरून एखाद्याला कानाखाली मारणे कितपत योग्य आहे. असा सवाल हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. ही सगळी घटना त्या अज्ञात व्यक्तीने स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेली असते. पण, ही घटना पंजाबमध्ये कुठे आणि कधी घडली याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @thewhatup या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मात्र व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी निराशा व्यक्त केली आहे. “एक समस्या सोडवायला जाताना दुसरी समस्या निर्माण करणे”, “लोकांना सुधारणे ठीक आहे. पण, केवळ गरिबांवर हिंसाचार करणे चुकीचे आहे. जर त्याजागी कोणी श्रीमंत असता तर त्यांनीही असेच केले असते का?”, “तुला त्याला मारण्याचा हक्क कोणी दिला? ती गरीब माणसे होती म्हणून त्यांनी सहन केले. श्रीमंत असता तर तू दुर्लक्ष करून पुढे गेला असतास”, “हे खूप चुकीचे आहे, तुम्ही त्यांना ते साफ करण्यास आणि कॅमेऱ्यासमोर माफी मागण्यास सांगू शकला असता. अचानक एखाद्याला मारणे हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही. मला आता त्या लोकांबद्दल वाईट वाटते, जरी ते चूक असले तरीही” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.