Viral Video: माशांना तोंडाने खाऊ घालत होता; आणि…

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका तरुणाला माशांना त्याच्या तोंडाने मासे खाऊ घालणे महागात पडले आहे.

fish viral video
व्हायरल व्हिडीओ (@resepmasakanidaman / Instagram )

आपण कुठेही फिरायला जातो तेव्हा किंवा प्राणीसंग्रहालयात गेल्यावर हमखास पक्ष्यांना,प्राण्यांना खायला देतो. मात्र प्राणी किंवा पक्ष्यांना खायला घालतानाही काळजी घ्यावी, अन्यथा काय होऊ शकते याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माशांना खायला घालताना एका व्यक्तीसोबत असे काही घडले, जे पाहिल्यानंतर तुम्हीही सावध व्हाल.

काय आहे व्हिडीओमध्ये?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका तरुणाला मासे खाऊ घालणे महागात पडले आहे. तो खाऊ घालत असलेल्या माशांनी त्या तरुणाला पाण्यात ओढले. खरे तर दोष त्या व्यक्तीचा आहे. तो माणूस तोंडाने माशांना खाऊ घालत होता आणि माशांनी त्याच्यावर हल्ला केला.

( हे ही वाचा: Viral: हत्तीने फिल्मी स्टाईल हत्तीणीला केलं प्रपोज, पुष्पगुच्छ देतं व्यक्त केलं प्रेम; पाहा व्हिडीओ )

( हे ही वाचा: ‘या’ चार शहरात उघडणार लेडीज स्पेशल वाईन शॉप! )

हा व्हिडीओ resepmasakanidaman या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. काचेच्या टाकीत मोठमोठे मासे आहेत हे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. हा तरुण एक छोटा मासा तोंडात धरतो आणि टाकीजवळ जाऊन माशांना खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून मासे तोंडाला येतात. काही सेकंदातच एक मासा तरुणाच्या चेहऱ्यावर आदळतो, त्यामुळे त्याचा तोल जातो. माशांना खायला देत असताना हा तरुण पाण्याच्या टाकीत पडला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video man was feeding fish by his mouth horrible ttg

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !
ताज्या बातम्या