Viral Video: अनेकांना प्राणी खूप प्रिय असतात. पण, तेच प्राणी त्यांच्याबरोबर कधी काय करतील हे सांगता येत नाही. माणसांनी कितीही जीव लावला तरी बऱ्याचदा प्राणी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक माकड महिलेला त्रास देताना दिसत आहे.

समाजमाध्यमांवर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. त्यातील काही व्हिडीओंमुळे आपल्या चेहऱ्यावर हसू येतं; तर काही व्हिडीओंमुळे आपल्या काळजाचा थरकाप उडतो. सोशल मीडियावर बऱ्याचदा प्राण्यांचेही अनेक विविध प्रकारचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, ज्यामध्ये अनेकदा काही प्राणी एकमेकांशी भांडण करताना दिसतात; तर काही प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एका महिलेबरोबर माकड असं काहीतरी करतेय, जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक प्राणीप्रेमी महिला जंगलाच्या परिसरामध्ये माकडांना खाऊ देण्यासाठी आली आहे. त्यावेळी ती एका माकडाला स्वतःच्या हाताने शेंगदाण्याचे टरफल काढून देते. पण, त्या प्रसंगी अचानक माकड त्या महिलेचे केस ओढायला सुरुवात करतो आणि त्यानंतर तिथून पळून जातो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @connect_2_v या अकाउंटवर शेअर केला गेला असून, त्यावर आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय की, अरे देवा हे काय?, तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, अरे बापरे, प्राणी कधी काय करतील हे सांगता येत नाही. आणखी एकानं लिहिलंय की, ताई काळजी घेऊन सेवा कर. आणखी एकानं लिहिलंय की, ताई सांभाळून, काही माकडं खूप भयानक असतात.